Mon, Sep 21, 2020 05:36होमपेज › Goa › रेल्वे दुपदरीकरणास जमीन न दिल्यास प्रकल्प अन्यत्र नेणार

रेल्वे दुपदरीकरणास जमीन न दिल्यास प्रकल्प अन्यत्र नेणार

Published On: Sep 05 2019 1:42AM | Last Updated: Sep 05 2019 1:42AM
मडगाव : प्रतिनिधी 
राज्यात रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे सुरू असलेले काम जमीन न  मिळाल्याने बंद पडले आहे.गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, अन्यथा हा प्रकल्प दुसर्‍या ठिकाणी न्यावा लागेल, असा इशारा  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी बोलताना दिला. दुपदरीकरणासाठी जमीन मिळाल्यास हा प्रकल्प तातडीने पूर्ण होईल. दरम्यान, वास्को येथील कार्यक्रमातही मंत्री अंगडी यांनी अशाच आशयाचा इशारा दिला.

मडगाव कोकण रेल्वे स्थानकावर पदपुलाच्या पायाभरणी कार्यक्रमात बोलताना दिला. यावेळी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, दक्षिण पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर ए. के. सिंग पायाभरणी कार्यक्रमाला उपस्थित होते.

अंगडी म्हणाले की, गोवा राज्य एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याची प्रशंसा केली आहेे. आम्ही दुसर्‍या देशातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी जातो, पण आपल्या देशातील पर्यटनस्थळे जतन करून ठेवण्यात मागे पडतो. गोवा एक सुंदर पर्यटनस्थळ येथे जगातील कोणत्याही देशाचे पर्यटक आकर्षित होऊ शकतात, त्या द‍ृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहेे.  रेल्वेने नेहमी प्रवाशांची सुरक्षा, नियमितपणा आणि स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे.

जेव्हा या देशाचे पंतप्रधान हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले तेव्हा सामान्य लोकांना आणि सरकारी कर्मचार्‍यांना स्वच्छतेचे महत्व कळाले.रेल्वेतील स्वच्छतेचे श्रेय रेल्वेच्या कर्मचारी वर्गाला जात असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेत स्वच्छता राखण्याची जबाबदारी केवळ अधिकार्‍यांची नसून प्रवाशांचीही आहे.सामान्य जनतेने कचर्‍याबद्दल  जबाबदार्‍या ओळखल्यास हा देश कचरा मुक्त होण्यास वेळ लागणार नाही, असेही अंगडी म्हणाले.गोव्यात येणार्‍या पर्यटकांना सुद्धा स्वच्छतेविषयी समज देणे गरजेचे आहे.बेळगाव मधून गोव्याला भाजी,दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो.आगामी काळात कर्नाटक आणि गोव्याचे संबंध आणखी  सुधारणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला 

आयुषमंत्री श्रीपाद नाईक  म्हणाले, की कोकण रेल्वे हे सामान्य जनतेसाठी वाहतुकीचे महत्त्वाचे साधन   आहे.लोकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वेने कडून प्रयत्न केले जात आहेत.कोंकण रेल्वेच्या प्रयत्नांना लोकांचा पाठिंबा मिळाल्यास कोंकण रेल्वेला आणखी बळ मिळेल.

मडगाव कोकण रेल्वे स्थानकावर पदपुलाची अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती.रेल्वे मंत्र्यांनी ही प्रलंबित मागणी पूर्ण केल्याचे ते म्हणाले.आपण गेल्या कार्यकाळात रेल्वे साठी पंचवीस कोटी रुपये निधी मंजूर केला होता.त्याच बरोबर माजी खासदारांनी सुद्धा त्यांच्या कार्यकाळात अडीज कोटी रुपये खासदार निधीतून रेल्वे साठी खर्च केले होते.जुने गोवे,मडगाव आणि इतर रेल्वे स्थानकांवर ही कामे पूर्ण होत चालली आहेत.रेल्वेचा विकास व्हावा त्याच बरोबर रेल्वे तून प्रवास करणार्‍या गोमंतकीयांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, ही त्या मागील भावना असल्याचे नाईक यांनी सांगितले.

गोव्यात प्लास्टिकचा वापर करणार नाही, असा निश्चय आम्ही केल्यास भविष्यात गोवा राज्य एक प्लास्टिक मुक्त राज्य म्हणून ओळखले जाईल असे नाईक म्हणाले.प्लास्टिकमुळे गोव्याचे भकास चित्र निर्माण झाले आहे.गोव्याची छबी बदलायची असल्यास प्लास्टिकचा वापर करणार नाही, असा निर्धार सर्वांना करावा लागेल,असे आवाहन श्रीपाद नाईक यांनी केले. राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर आणि विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांचे यावेळी भाषण झाले.