Sat, Aug 15, 2020 12:24होमपेज › Goa › गोवा सरकार पाणी पूरवठ्याबाबतीत अयशस्वी

गोवा सरकार पाणी पूरवठ्याबाबतीत अयशस्वी

Published On: Aug 21 2019 1:31AM | Last Updated: Aug 20 2019 8:47PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरपणजी : प्रतिनिधी

तिसवाडी व फोंडा तालुक्याला पाण्यासारखी प्राथमिक  गरज पुरवण्यास  सरकार अपयशी ठरले असून याचा निषेध आम्ही करतो. या सर्वाची जबाबदारी स्विकारुन मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केली. तिसवाडी व फोंडा तालुका मागील सहा दिवसांपासून पाण्यासाठी वणवण करीत आहे.  पाण्यासाठी लोकांचे हाल होत असल्याचा आरोपही  त्यांनी केला.

चोडणकर म्हणाले की,  पाण्यासारखी गरज लोकांना न पुरवून भाजप सरकारने याबाबती भाजप सरकारने  इतिहास रचला आहे. जलवाहिन्यांचे काम पुर्ण होऊन  पाणी पुरवठा सुरळीत होई पर्यंत लोकांना पाण्याची  पर्यायी  व्यवस्था करण्याचे काम सरकारने करणे अपेक्षित होते. मात्र  असे काहीच करण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. 

सरकार याबाबत पुर्णपणे अपयशी ठरले असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजीनामा द्यावा. तिसवाडी व फोंडा या दोन तालुक्यांमध्ये पाणी समस्या निर्माण झाली असताना देखील या जलवाहिन्यांचे काम युध्दपातळीवर  का हाती घेण्यात आले नाही असा प्रश्‍न त्यांनी केला.