Thu, Oct 01, 2020 17:36होमपेज › Goa › गोवा बंदमुळे प्रवाशांचे हाल

गोवा बंदमुळे प्रवाशांचे हाल

Published On: Jan 09 2019 12:49PM | Last Updated: Jan 09 2019 12:49PM
पणजी: प्रतिनिधी

कामगार तसेच लोकविरोधी धोरणांच्या निषेर्धात पुकारण्यात आलेल्या गोवा बंदला पाठींबा देण्यासाठी खासगी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची बरीच गैरसोय झाली. कदंब महामंडळाकडून अतिरी3त बसेस राज्यातील विविध मार्गावर सूरु करण्यात आली असली तरी प्रवाशांचे मात्र काही प्रमाणात हाल झाले.

सकाळीच्या वेळी काही तासांसाठी फेरीबोट सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सकाळी कामासाठी जाणार्‍या लोकांचे हाल झाले. त्यानंतर ११ वाजण्याच्या सुमारास फेरीबोट सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली. एकूणच गोवा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.