Sun, Sep 20, 2020 11:09होमपेज › Goa › फ्रांसिस सार्दीन, एल्विस गोम्स यांच्‍याकडून अर्ज दाखल

फ्रांसिस सार्दीन, एल्विस गोम्स यांच्‍याकडून अर्ज दाखल

Published On: Apr 02 2019 5:35PM | Last Updated: Apr 02 2019 5:30PM
मडगाव : प्रतिनिधी

काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे लोकसभा उमेदवार फ्रांसिस सार्दीन आणि आपचे उमेदवार एल्विस गोम्स यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मंगळवारी (ता.२) आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. 

खाण व्यवसाय, कोळसा प्रदूषण, मत्स्योद्योग अशा विषयांवर सरकार आणि दोन्ही खासदर अपयशी ठरले आहेत. लोकांचा प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित आहे असा विश्वास फ्रान्सिस सार्दीन यांनी व्यक्त केला आहे. सत्ताधारी सरकारच्या विश्वासघातकी भूमिकेमुळे त्रस्त झालेल्या जनतेने सरकारचा निषेध म्हणून आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्यास सुरू केले आहे, अशी माहिती आपचे एल्विस गोम्स यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या समर्थकांची रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दीन यांनी काँग्रेसच्या दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयाकडून रॅली काढली. या रॅलीत विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, कुडतरी चे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, कुंकळीचे क्लफॅसियो डायस,प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकार, नुवेचे आमदार आमदार विल्फ़्रेंड डीसा, काणकोणचे आमदार इजिदोर फेर्नांडिस, फोंडाचे आमदार रवी नाईक, सालीगाव च्याजेनिफर मोंन्सरात,केपेचे नागराध्यक्ष दयेश नाईक तसेच दक्षिण गोव्यातील काँगेसचे विविध पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

सार्दीन यांच्याबरोबर केवळ चार जणांना आत सोडण्यात आले. यात बाबू कवळेकर, दिगंबर कामत, इजिदोर फेर्नांडिस, गिरीष चोडणकार व इतरांचा समावेश होता.