Mon, Sep 21, 2020 05:26होमपेज › Goa › ठाणा-कुठ्ठाळीत फायबर बोटीला आग

ठाणा-कुठ्ठाळीत फायबर बोटीला आग

Last Updated: Apr 27 2020 12:48AM

संग्रहित छायाचित्रवास्को : पुढारी वृत्तसेवा 

ठाणा कुठ्ठाळी येथील एका शिपयार्डमधील फायबर बोटीला रविवारी सायंकाळी लागलेल्या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. सदर आग विझविण्यासाठी वेर्णा, वास्को, मडगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केले. आगीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत चालले होते.

सदर फायबर बोट कोस्टल पोलिस विभागासाठी बांधण्यात आली होती. ती बांधण्याचे काम पूर्ण झाल्याने ती बोट कोस्टल पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात येणार होती. तथापी लॉकडाऊनमुळे सदर बोटीचे हस्तांतरण होऊ शकले नसल्याने बोट त्या शिपयार्डमध्येच ठेवण्यात आली होती. या बोटीला रविवारी सायंकाळी आग लागली असल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब त्वरित तेथे पोहचले. तसेच पाणीवाहू टँकरची तेथे व्यवस्था करण्यात आली होती. परंतु आगीचा भडका मोठा असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला मोठे प्रयत्न करावे लागले. आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला.

 "