Thu, Oct 01, 2020 03:50होमपेज › Goa › खाणबंदीवर तोडग्यासाठी राज्य, केंद्र सरकारमध्ये चर्चा

खाणबंदीवर तोडग्यासाठी राज्य, केंद्र सरकारमध्ये चर्चा

Published On: Feb 01 2019 1:19AM | Last Updated: Jan 31 2019 11:37PM
पणजी : प्रतिनिधी

खाणबंदीचा परिणाम प्रत्येक गोमंतकियावर होत आहे. खाण विषयाच्या तोडग्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार मध्ये या चर्चा सुरू आहेत, अशी लेखी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची विधानसभेत दिली. विधानसभेत विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांनी खाण व्यवसायाविषयी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. 

बाबू कवळेकर म्हणाले, की खाण व्यवसायावर अवलंबित गोमंतकीय अजूनही त्याच हालाखीच्या अवस्थेत आहेत. त्यांना सरकारकडून मिळणारी सहानूभुती पुरेशी नाही. गेले कित्येक महिने खाण प्रश्‍नावर काहीच तोडगा निघालेला नाही. खाण व्यवसाय सुरू व्हावा, यासाठी कोणते  प्रयत्न सुरू आहेत त्याचा सरकारने खुलासा करावा. खाणींबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेले पत्र राज्य सरकारने जाहीर करावे. राज्य सरकारचा केंद्र सरकारसोबत सुरू असलेला पत्र व्यवहारही सादर करून स्पष्टीकरण द्यावे. त्याचबरोबर  सरकारने खाण अवलंबितांना खाण व्यवसाय लवकरच सुरू करण्याचे आश्‍वासन देऊन तशी पावले उचलावीत, अशी मागणीही कवळेकर यांनी केली.

मायकल लोबो म्हणाले, की राज्यात खाण व्यवसाय बंदीला सात दिवसांनी एक वर्ष पूर्ण होणार आहे. राज्यातील चाळीसही आमदार खाण बंदी उठविण्यासाठी प्रयत्न करत असताना यावर तोडगा निघत नाही, ही बाब फार गंभीर आहे. या विषयावर  पूर्वीही विधानसभेत मोठमोठी भाषणे झाली. मात्र, हा आवाज केंद्र सरकारकडे पोचत का नाही, असा प्रश्‍न लोबो यांनी उपस्थित केला.   

खाणप्रश्‍नी तोडगा काढावा

खाण अवलंबितांवर कठीण दिवस येऊन ठेपले आहेत. खाण अवलंबितांबद्दल सरकार व सर्वांनीच बोलणे बंद करायला हवे. खाणप्रश्‍नी योग्य तोडगा काढून लवकरात लवकर हा विषय सोडविणे आवश्यक आहे. जितके पर्याय असतील ते सर्व अवलंबून खाण प्रश्‍न सोडवावा, असे आमदार लुईझिन फालेरा यांनी सांगितले.