Sat, Aug 15, 2020 12:57होमपेज › Goa › वाहन खरेदीवर करमाफीला मुदतवाढीचा विचार : गुदिन्हो

वाहन खरेदीवर करमाफीला मुदतवाढीचा विचार : गुदिन्हो

Last Updated: Dec 14 2019 1:29AM
पणजी : प्रतिनिधी
राज्यात नव्याने खरेदी करण्यात येणार्‍या वाहनांवर रस्ता करात जाहीर करण्यात आलेल्या 50 टक्के करमाफीचा लाभ येत्या 18 जानावेरी- 2020 पर्यंत वाढवण्याचा वाहतूक खात्याचा विचार आहे. सदर प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणून त्याला मंजुरी मिळवण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी मिरामार येथे एका शासकीय कार्यक्रमानंतर पत्रकारांना सांगितले.

गुदिन्हो म्हणाले, की राज्यात गेल्या तीन महिन्यात वाहन नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. डिसेंबरपासून नव्या वाहनांवर  रस्ता करात सवलत मिळत असली तरी ‘जीएसटी’मध्ये वाढ झाली आहे. यामुळे ‘जीएसटी’द्वारे येणार्‍या महसुलाचे प्रमाण वाढले आहे. दुचाकींच्या नोंदणीवर खात्याला सुमारे एक कोटींचा महसूल गमवावा लागला असला तरी, महागड्या गाड्यांची राज्यात नोंद वाढली असल्याने 10 कोटींचा अतिरिक्त महसूल मिळाला आहे. आधी जाहीर केलेली रस्ता कर सवलत येत्या 30 डिसेंबरला समाप्त होत आहे. मात्र, नववर्षाला अनेकजण वाहने खरेदी  करत असल्याने, ही कर सवलत आणखी काही दिवस वाढवण्याचा आपला प्रयत्न  सुरू असून हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार आहे.