Mon, Sep 21, 2020 05:26होमपेज › Goa › कलम-144 लावण्याचा विचार : विश्‍वजित राणे

कलम-144 लावण्याचा विचार : विश्‍वजित राणे

Last Updated: Mar 21 2020 1:14AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

‘कोरोना व्हायरस’चा प्रसार होऊ नये म्हणून राज्यात कलम-144 लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार असून गरज पडल्यास तातडीने त्यासंबंधी आदेश लागू केला जाऊ शकतो, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी शुक्रवारी पर्वरी येथील मंत्रालयात सांगितले. 

राणे म्हणाले की, राज्यात शेजारील राज्यांतून होणारी आंतरराज्य बस वाहतूक संसर्ग वाढू नये म्हणून बंद करण्याचाही प्रस्ताव आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे दिला असून त्याबाबतही विचार होऊ शकतो. शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांत सुट्टी पडल्याने अजूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक टेम्पो ट्रॅव्हलर, ट्रॅक्स आणि जीप गाड्यांतून गोव्यात दाखल होत असल्याचे आढळून आले आहे.  दरम्यान, गोमेकॉत ‘व्हायरोलॉजी’ प्रयोगशाळा स्थापन करण्यास मुख्यमंत्री सावंत यांनी मान्यता दिली असून त्यासाठी सर्व खर्च केंद्र सरकार करणार आहे, असेही राणे यांनी सांगितले.
 

 "