Thu, Oct 01, 2020 18:23होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांची आज पंतप्रधानांशी भेट

मुख्यमंत्र्यांची आज पंतप्रधानांशी भेट

Published On: Mar 21 2019 12:57AM | Last Updated: Mar 20 2019 11:39PM
पणजी : प्रतिनिधी

राज्याचे नवे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आपल्या पदाचा ताबा  स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच गुरुवारी दिल्लीला जाणार असून, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेणार आहेत, असे मुख्यमंत्री कार्यालयातून कळवण्यात आले आहे. 

सावंत यांनी मुख्यमंत्री म्हणून मंगळवारी पहाटे 2 वाजता पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर  बुधवारी भाजप आघाडी सरकारवरील विश्‍वासदर्शक ठरावही त्यांनी सहजपणे जिंकून दाखवला. आता, काहीसा निवांतपणा मिळाला असला तरी राज्याच्या अनेक गरजा भागवण्यासाठी केंद्र सरकारचे सहाय्य मिळणे गरजेचे आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. 

आधीचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची केंद्र सरकारमधील सर्वच मंत्र्यांशी चांगली ओळख होती. तसेच पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या दरबारातही पर्रीकर यांना चांगला मान  होता. केंद्र सरकारकडे तसेच भाजपच्या वरीष्ठ नेत्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठीच सावंत दिल्लीला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.