Mon, Sep 21, 2020 04:15होमपेज › Goa › भाऊसाहेब बांदोडकर यांना भावपूर्ण आदरांजली

भाऊसाहेब बांदोडकर यांना भावपूर्ण आदरांजली

Published On: Mar 12 2019 2:50PM | Last Updated: Mar 13 2019 1:41AM
पणजी : प्रतिनिधी

गोवा राज्याचे भाग्यविधाते तथा मुक्तीनंतरचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांना आज (मंगळवारी) अनेक नेत्यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. आजारी असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही ट्विटरद्वारे दिलेल्या संदेशात म्हटले आहे, की राज्याच्या विकासाचा पाया रचन्यासाठी स्व. बांदोडकर यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे आम्ही नित्य स्मरण करत आहोत. 

मिरामार किनार्‍यावरील बांदोडकर यांच्या समाधीच्या स्थळी राज्याचे मुख्य सचिव परिमल राय (आयएएस), सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर आणि अन्य मान्यवरांनी पुष्पांजली वाहिली. बांदोडकर यांच्या कन्या ज्योती बांदेकर यांनीही आपल्या पित्याला समाधीवर आदरांजली अर्पित केली. 

येथील जून्या सचिवालयाजवळील बांदोडकर यांच्या पूर्णाकृती पूतळ्यावरही सभापती डॉ. प्रमोद सावंत आणि अन्य मान्यवरांनी पुष्पहार घालून आदरांजली वाहिली. पर्वरी येथील सचिवालय संकुलातील भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याला माहिती व तंत्रज्ञान, महसूल तथा कामगार मंत्री रोहन खंवटे आणि अन्य सरकारी अधिकार्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आदरांजली वाहिली.