Thu, Oct 01, 2020 17:18होमपेज › Goa › राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीसाठी राज्यातील भाजप नेते दिल्लीला

राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीसाठी राज्यातील भाजप नेते दिल्लीला

Published On: Jan 11 2019 1:17AM | Last Updated: Jan 11 2019 1:17AM
पणजी : प्रतिनिधी

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या  शुक्रवारी (दि.11) दिल्लीत होणार्‍या बैठकीसाठी राज्यातील भाजपचे अनेक आजी-माजी मंत्री, आमदार तसेच महत्त्वाचे पदाधिकारी मिळून एकूण 64 जणांचे पथक गुरूवारी रात्री उशिरा दिल्लीला रवाना झालेे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बंडाची भूमिका घेतलेली असली तरी तेही दिल्लीस जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भाजप राष्ट्रीय  कार्यकारिणीच्या  शुक्रवारी सकाळी 10 वाजता आयोजित बैठकीसाठी गोव्याहून   भाजपचे सर्व आमदार, तिन्ही खासदार तसेच भाजपचे सर्व माजी प्रदेशाध्यक्षही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, भाजपचा अल्पसंख्याक विभाग, युवा मोर्चा, किसान मोर्चा, अनुसूचित जाती, जमाती मोर्चा यांचेही अध्यक्ष बैठकीत सहभागी होणार आहेत. 
पार्सेकर यांना अंधारात ठेवून त्यांचे कट्टर राजकीय विरोधक दयानंद सोपटे यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश दिल्याबद्दल पार्सेकर पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत. पार्सेकर यांनी यापूर्वी पर्रीकर यांच्या खासगी निवासस्थानी झालेल्या भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीवरही बहिष्कार टाकला होता.पार्सेकर हे गोवा प्रदेश भाजपचे दोनवेळा प्रदेशाध्यक्ष होते. मध्यंतरी त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत बोलावून घेतले होते. शहा यांच्याशी चर्चा करून ते परतले, पण त्यांची भूमिका सौम्य झालेली नाही.