Tue, Aug 04, 2020 11:21होमपेज › Goa › राज्यात सलग तिसर्‍या दिवशी आणखी 100 कोरोना रुग्ण

राज्यात सलग तिसर्‍या दिवशी आणखी 100 कोरोना रुग्ण

Last Updated: Jul 11 2020 1:23AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात सलग तिसर्‍या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने शतक गाठले असून शुक्रवारी 100 नवे रुग्ण आढळले आहेत. 74 रुग्णांची प्रकृती सुधारली असून राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 895 वर पोहोचल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. 

राज्यात आतापर्यंत 2251 बाधित रुग्ण आढळले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर बरे झालेल्यांची संख्या 1347 झाली आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये रस्ता, रेल्वे आणि विमानमार्गे राज्यात दाखल झालेल्या 75 रुग्णांचा  समावेश  आहे.  मांगोरहिलमधील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 66 असून मांगोरहिलशी संबंधित 305 रुग्ण आहेत. राज्यात विविध ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण सापडणे सुरूच असून आतापर्यंत सडा-88, बायणा-91, कुडतरी-32, न्यू वाडे-78, चिंबल-60, झुआरीनगर-118, मोर्ले-22, खारीवाडा-52 व बाळ्ळीत 27 रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.

राज्यात शुक्रवारी  4500  नमुन्यांची चाचणी केली. त्यातील 1715  नमुन्यांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला. अजूनही 2685 अहवाल प्रलंबित आहेत. राज्यातील सरकारी विलगीकरणात राहणार्‍या लोकांचा आकडा 75 वर पोहोचला असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

कोरोना रुग्णामुळे शिक्षण संचालनालयाचा विभाग बंद

पर्वरी येथील शिक्षण संचालनालयातील एक कर्मचारी शुक्रवारी कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ माजली. हा कर्मचारी काम करत असलेला विभाग सध्या बंद ठेवला असून या विभागातील 20 कर्मचार्‍यांची कोरोनासंबंधी चाचणी केली आहे. या चाचण्यांचा अहवाल अजून आलेला नाही, मात्र त्यांना आपल्या घरातच विलगीकरणात राहण्यास सांगितले आहे. याशिवाय, कोलवाळ उपतुरुंगात घेलेल्या 203 कैद्यांचे आणि कर्मचार्‍यांच्या नमुन्यांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने तुरुंग प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडल्याचे सूत्रांनी सांगितले.