Mon, Nov 30, 2020 13:39होमपेज › Goa › गोव्यात ३ कोटींच्या ड्रग्‍ससह एका नायजेरीयन व्यक्‍तीस अटक

गोव्यात ३ कोटींच्या ड्रग्‍ससह एका नायजेरीयन व्यक्‍तीस अटक

Last Updated: Oct 29 2019 8:26PM
पणजी : प्रतिनिधी

उत्तर गोव्यातील कांदोळी किनार्‍यावर कळंगुट पोलिसांनी घातलेल्या छाप्यात मंगळवारी 1 किलो कोकेन आणि अन्य अमली पदार्थ मिळून 3 कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका नायजेरियन नागरीकालाही अटक करण्यात आली आहे. 

कळंगूट पोलिसांना अमली पदार्थांची तस्‍करीविषयी माहिती मिळाली होती. त्‍यावरून कळंगूट पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक नालास्को रापोस यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कांदोळी येथील एका आस्थापनात छापा टाकला. यावेळी नायजेरीयन नागरीक इफेनी पास्कोल ओबी (वय. 34) याला अटक केली. या इसमाची तपासणी केली असता, 1.02 किलो कोकेन, 2.035 किलो एमडीएम, 106 ग्रॅम चरस, 1.27 किलो गांजा आणि 2 लाख रूपये रोख रक्कम सापडली. पकडण्यात आलेल्या सर्व मालाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 3 कोटी असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. हा आतापर्यंत गोवा पोलिसांकडून  पकडण्यात आलेला सर्वात मोठ अमली पदार्थांचा साठा आहे. 

कळंगूट पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी पर्वरी  उपविभागीय अधिकारी एडविन कुलासो आणि उत्तर गोव्याचे पोलिस अधिक्षक उत्कृीष्ठ प्रसुन हे पुढील तपास करत आहेत.