Wed, Aug 12, 2020 01:13होमपेज › Goa › राज्यात ९० नवे कोरोनाबाधित

राज्यात ९० नवे कोरोनाबाधित

Last Updated: Jul 08 2020 1:45AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

खोर्ली - म्हापसा, बांबोळी, कुजीरा - सांताक्रुज, बेतालभाटी या भागात पहिल्यांदाच कोरोनाने शिरकाव केल्याचे आढळले असून  राज्यात मंगळवारी 90 नवे कोरोनाबाधित आढळून आले. 95 रुग्ण बरे झाले आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 739 वर पोचली असल्याची माहिती आरोग्य खात्याने मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालात दिली आहे. 

राज्यात आतापर्यंत 1903 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. कोरोना ‘पॉझिटिव्ह’ होऊनही बरे झालेल्यांची संख्या 1156 झाली आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णामध्ये रस्ता, रेल्वे आणि विमानमार्गे राज्यात दाखल झालेल्या 115 रुग्णांचा  समावेश  आहे.   

राज्यात सोमवारी 3197  नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यातील 2057  नमुन्यांचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला. अजूनही 1040 अहवाल प्रलंबित आहेत. राज्यातील सरकारी विलगीकरणात राहणार्‍या लोकांचा आकडा 115 वर पोचला असल्याचे सूत्रांनी सांगितले.