Thu, Oct 01, 2020 02:25होमपेज › Goa › अर्थसंकल्पीय अधिवेशनात 11 पैकी 8 विधेयके संमत

अर्थसंकल्पीय अधिवेशनात 11 पैकी 8 विधेयके संमत

Last Updated: Feb 07 2020 11:27PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

गोवा राज्य विधानसभेच्या 3 ते  7 फेब्रुवारी या कालावधीत पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात  अकरा विधेयके मांडण्यात आली. त्यातील आठ विधेयके संमत करण्यात आली. यात  सात सरकारी व एका खासगी  विधेयकाचा समावेश  असून  एक विधेयक चिकित्सा समितीकडे वर्ग करण्यात आले आहे,असे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी  शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात  सांगितले. या अधिवेशनात  दहा लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या.  अधिवेशनाचे कामकाज व्यवस्थित पार पडले, असेही  त्यांनी  सांगितले.

उपसभापती फर्नांडिस म्हणाले, या अधिवेशनाची सुरवात 7 जानेवारी रोजी एक दिवसीय कामकाजाने झाली. यावेळी  विधानसभेत  केंद्रीय विधेयक  संमत करण्यात आले होते.या केंद्रीय विधेयकाला लोकसभा तसेच राज्यसभेत यापूर्वीच मंजुरी  देण्यात आली होती. त्यानंतर 3 ते  7 फेब्रुवारी या कालावधीत पाच दिवसीय अर्थसंकल्पीय  अधिवेशन पार पडले.  या वेळी  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी  राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी एकूण 20 तारांकीत प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. तर पाच तारांकित व सहा अतारांकित प्रश्न  पुढे ढकलण्यात आले.  याशिवाय  अकरा अभिनंदन ठराव व श्रध्दांजली  ठराव देखील मांडण्यात आले. त्याचबरोबर या अर्थसंकल्पीय अधिवेशनात  एकूण अकरा  विधेयके मांडण्यात आली होती. त्यापैकी  आठ मंजूर करण्यात आली.  यात   सात सरकारी  व एका खासगी  विधेयकाचा समावेश आहे. तर एक विधेयक  चिकीत्सा समितीकडे वर्ग करण्यात आले. याशिवाय  विविध ठराव देखील  मांडून ते संमत करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

अधिवेशन काळात विधानसभेत येणार्‍या  आमदारांच्या वाहनांना विशेष पास दिले जातात. मात्र या पास चा वापर अन्य जणांकडून देखील वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. आमदारांसाठी असलेला पास हा आमदारांनीच वापरावा .सदर प्रकार योग्य नाही. या पासचा  वापर  अन्य कुणीही  करू नये , असेही उपसभापती फर्नांडिस यांनी यावेळी बजावले. 

 "