Sun, Sep 20, 2020 09:22होमपेज › Goa › राज्यातील ७० हजार घरांना वैयक्‍तिक शौचालयाची देणार सुविधा

राज्यातील ७० हजार घरांना वैयक्‍तिक शौचालयाची देणार सुविधा

Published On: Jan 29 2018 12:28AM | Last Updated: Jan 29 2018 12:22AMमडगाव ः प्रतिनिधी 

आजही राज्यातील 70 हजार घरांत वैयक्तिक शौचालयाची सुविधा नाही. त्यामुळे सरकार घरांना शौचालयाची सुविधा देणार आहेत. त्याचे बांधकाम 2 ऑक्टोबरपर्यत पूर्ण करण्यात येणार आहे, असे आश्‍वासन  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले.

मडगाव येथील रवींद्र भवनात मातृछाय ट्रस्टच्या मुलींसाठी बाल सुरक्षात्मक घराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नगरविकासमंत्री विजय सरदेसाई,  मातृछाया ट्रस्टचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे आदीपस्थित होते. 

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, की गेल्या चाळीस वर्षापासून मुलींच्या कल्याणासाठी सुरू असलेले मातृछाया ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद आहे. क ाही लोक आपला वेळ, पैसा आणि साधनसंपत्ती दान करुन समाजिक कार्य करीत असतात. या संस्थेच्या विकासासाठी सरकार नेहमीच त्यांना मदत करेल.

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, की शनिवारी झालेल्या हागणदारी मुक्त कार्यक्रमाच्या एका बैठकीत गोव्यातील अनेक घरांत  शौचालय नाहीत असे निदर्शनास आहे. त्यामध्ये 70 हजार घरांमध्ये अजूनही वैयक्तिक शौचालय नाहीत. त्यामुळे सरकार 2ऑक्टोबर2018 पर्यंत या सर्व घरांना शौचालय बांधून देणार आहे. यासाठी लोकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.