Sat, Feb 27, 2021 06:14
गोवा अधिवेशनात तीन दिवसात १० विधेयके मांडली जाणार

Last Updated: Jan 22 2021 1:38AM
पणजी :  पुढारी वृत्तसेवा

गोवा विधानसभेचे (Goa Assembly session) यंदाचे अधिवेशन दि. 25 ते 29 जानेवारी असे पाच दिवस चालणार असले तरी यातील फक्त चार दिवसच अधिवेशनाचे कामकाज प्रत्यक्षात चालणार आहे. अधिवेशनात चार खासगी विधेयके आणि सरकारी सहा विधेयके मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. सरकारी विधेयके आणखीही वाढण्याची शक्यता असून शेवटच्या दिवशी शुक्रवारी पाच खासगी ठराव चर्चेसाठी येणार असल्याची माहिती सभापती राजेश पाटणेकर यांनी गुरूवारी विधानसभा संकुलात दिली.(10 bills will be tabled for approval in three days in Goa Assembly session)

वाचा : सत्तरीत ३५ जणांना अतिसार

पाटणेकर म्हणाले, की विधानसभा कामकाज समितीच्या बैठकीत अधिवेशनातील कामकाज निश्चित करण्यात आलेले आहे. अधिवेशनच्या दि. 27, 28 आणि 29 या तीन दिवशी प्रश्नोत्तर तास, शुन्य प्रहर निश्चित करण्यात आलेले आहेत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

वाचा : वादग्रस्त ‘ट्रॅफिक सेंटीनल’ योजना रद्द

विधानसभेतील सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून एकूण 751 प्रश्न दाखल झाले आहेत. यातील तारांकीत 195 आणि अ -तारांकीत 556 प्रश्न आहेत. कोरोनाच्या कारणामुळे काळजी घेताना सर्व सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली जाणार असून प्रेक्षकांची गॅलरी बंद करण्यात आली असल्याचे सभापती राजेश पाटणेकर यांनी सांगितले.

वाचा : केंद्रीय समितीने वास्तव अहवाल द्यावा