Mon, Sep 21, 2020 06:07होमपेज › Goa › 'मगो' बनला ढवळीकरांच्या घरचा पक्ष : मामलेदार

'मगो' बनला ढवळीकरांच्या घरचा पक्ष : मामलेदार

Published On: May 04 2019 2:11PM | Last Updated: May 04 2019 2:11PM
पणजी : प्रतिनिधी

'महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष' हा ढवळीकरांच्या घरचा पक्ष बनला आहे. उमेदवार देखील ढवळीकर बंधूच ठरवतात. तर केंद्रीय समितीला केवळ निर्णय कळवण्यात येतो, असा आरोप माजी आमदार लवू मामलेदार यांनी पत्रकार परिषदेत आज केला.

या पत्रकार परिषदेत ढवळीकर बंधूंनी केलेल्या विविध आरोपांवर खुली चर्चा करायला आपण तयार असल्याचेही लवू मामलेदार यांनी यावेळी स्पष्ट केले.

यानंतर माजी आमदार लवू मामलेदार म्हणाले की, 'महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष' हा घरचा पक्ष असल्याप्रमाणे ढवळीकर बंधू वागत असल्याने पक्षाचा विस्तार होऊ शकला नाही. या पक्षात असे अनेक कार्यकर्ते आहेत. ज्यांना ढवळीकर बंधू यांच्याकडून राबवण्यात येणारी पक्षाचे धोरण आवडत नाहीत. मात्र त्यातील काहीच जण त्याविरोधात आवाज उठवतात., अशी टीका त्यांनी केली.