Sat, Feb 27, 2021 07:07
UPSC तर्फे केवळ मुलाखतद्वारे भरती; आजच करा अर्ज

Last Updated: Feb 03 2021 12:30PM

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

यूपीएससीमार्फत उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळाली आहे. यूपीएससीतर्फे विनापरीक्षा केवळ मुलाखत घेऊन त्या आधारे उमेदवारांची निवड होणार आहे. ही भरती कशी होणार, यासंदर्भात जाणून घ्या.  

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आपणास कुठल्याही परीक्षेविना सरकारी नोकरीची (Central Govt Jobs) संधी देत आहे. यूपीएससीने अनेक पदांसाठी भरतीची माहिती जारी केली आहे. आयोगाच्या अधिकृत वेबसाईट (upsc.gov.in) वर भरतीचे नोटिफिकेशन जारी केलं आहे. या सरकारी नोकरीचे (Sarkari Naukri) डिटेल्स पुढे वाचा आणि आजचं अर्ज करा. 

पदांसंदर्भात माहिती

डेटा प्रोसेसिंग असिस्टंट - ११६ पदे (पे स्केल - लेवल ०७)

असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर - ८० पदे (पे स्केल - लेवल ०८)

स्पेशलिस्ट ग्रेड-३ असिस्टेंट प्रोफेसर - ४५ पदे (पे स्केल - लेवल ११)

ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर - ०६ पदे (पे स्केल - लेवल ०७)

लेक्चरर (मेडिकल सोशल वर्क) - ०१ पद (पे स्केल - लेवल १०)

असिस्टेंट डायरेक्टर (फिशिंग हार्बर) - ०१ पद (पे स्केल - लेवल १०)

एकूण पदांची संख्या - २९६

यांना करता येईल अर्ज-

पदांनुसार, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर ॲप्लीकेशन (MCA), आयटी ते इंजिनिअरिंग (BE / BTech), मेडिकल (MBBS), लॉ (LLB / LLM) ची पदवी घेतलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकता. 

पदांनुसार वयोमर्यादा - 

डाटा प्रोसेसिंग असिस्टेंट, असिस्टेंट पब्लिक प्रॉसेक्यूटर, ज्युनिअर टेक्निकल ऑफिसरच्या पदांसाठी वयोमर्यादा ३० वर्षे आहे. लेक्चरर आणि असिस्टेंट डायरेक्टरची वयोमर्यादा ३५ वर्षे आहे. स्पेशलिस्ट असिस्टेंट प्रोफेसरसाठी ४० वर्षांपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. त्याशिवाय सर्व पदांवर ओबीसी प्रवर्गात पदांसाठी ३ वर्षे आणि एससी, एसटी प्रवर्गातील सर्व पदांसाठी ५ वर्षांची सवलत मिळणार आहे.

अर्ज असा करावा-

अर्ज करण्याची अंतिम तारीख - ११ फेब्रुवारी २०२१ 

यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर (upsconline.nic.in) जाऊन अर्ज करता येईल. जनरल, ओबीसी, आर्थिक दुर्बल प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५ रुपये अर्ज शुल्क आहे. इतर प्रवर्गांसाठी अर्ज शुल्क नाही.

अशी होईल निवड - 

या पदांवर पात्र उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल. प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे शॉर्टलिस्ट करून उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. पण, यूपीएससीने म्हटले आहे की, जर अर्जांची संख्या अधिक झाली तर, शॉर्टलिस्टिंगसाठी परीक्षा घेतली जाऊ शकते. त्यामुळे अर्ज करताना सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे जमा करावे.