Thu, Oct 01, 2020 18:37होमपेज › Belgaon › काकतीजवळ शेतकर्‍याचा दगडाने खून

काकतीजवळ शेतकर्‍याचा दगडाने खून

Published On: May 27 2019 11:55PM | Last Updated: May 27 2019 11:55PM
बेळगाव : प्रतिनिधी

शेतीच्या वादातून एकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना काकती पोलिस स्थानकाच्या व्याप्तीतील अलभावी (ता. बेळगाव) येथे घडली. लगमाण्णा शट्याप्पा नाईक ऊर्फ जारकीहोळी (वय 50, रा. अलभावी) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध तक्रार दखल करण्यात आली अहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काकतीपासून जवळच असणार्‍या जंगल भागातील अलभावी येथील नाईक कुटुंबीयांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद सुरू आहे. सोमवारी पहाटे लगमाण्णा शेतात गेले होते. दरम्यान, त्यांच्याच भाऊबंदकीतील इराप्पा नाईक कुटुंबीयही शेतवडीत गेले होते. दरम्यान, शेतीच्या वादतून दोघांमध्ये वादावादी झाली. यावेळी चौघांनी मिळून लगमाण्णा यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केल्याची तक्रार काकती पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. 

याप्रकरणी लगमाण्णाचा भाऊ द्यामप्पा नाईक यांनी चौघांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार इराप्पा शट्याप्पा नाईक, लगमाण्णा शट्याप्पा नाईक, सचिन लगमाण्णा नाईक, परसाप्पा मल्लाप्पा कटाबळे या चौघा संशयितांविरेधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण एसीपी शिवा रेड्डी, पोलिस निरीक्षक एल.एच गवंडी, उपनिरीक्षक अर्जुन हंचिनमनी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जिल्हा शवागारात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. उपनिरीक्षक अर्जुन हंचिनमणी अधिक तपास करीत आहेत.