Tue, Sep 29, 2020 18:12होमपेज › Belgaon › बेळगावः जाळपोळ प्रकरणी २३ जणांना अटक

बेळगावः जाळपोळ प्रकरणी २३ जणांना अटक

Published On: Dec 19 2017 11:40AM | Last Updated: Dec 19 2017 11:46AM

बुकमार्क करा

बेळगावः प्रतिनिधी

काल सोमवारी रात्री खडक गल्ली, जालगार गल्ली, खडे बाजार परिसरात झालेल्या जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी पोलिसांनी आज (मंगळवार) सकाळीपर्यंत २३ जणांना अटक केली आहे.

जाळपोळीच्या घटनेनंतर पोलिसांनी या २३ जणांना अटक करून त्यांची रवानगी कारागृहात केली आहे.

मार्केट पोलिसांनी कलम १४३,१४७,१४८,१५३ अ,३३२, ३३३, ३०७, ४२७, ४३५, ३५३सह कलम १४९ आय पी सीनुसार या सर्वांवर दोन धर्मीयांत तेढ निर्माण करणे, सार्वजनिक मालमतेच नुकसान करणे, खूनाचा  प्रयत्न करणे आदी गुन्हे दाखल केले आहेत.

>> बातमीःबेळगावात धार्मिक तणाव, खडक गल्लीत दगडफेक