Sat, Aug 15, 2020 12:56होमपेज › Belgaon › सेंद्रिय शेतीला येताहेत ‘अच्छे दिन’

सेंद्रिय शेतीला येताहेत ‘अच्छे दिन’

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 8:06PMखानापूर : राजू कुंभार

रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापराने कडधान्य, फळे आणि भाजीपाल्यांमध्ये विषारी घटकांचे प्रमाण जास्त सल्याचे आढळून येत आहे. अशा आहाराच्या सेवनाने कर्करोग, रक्तदाब, त्वचारोग तसेच विविध प्रकारचे पोटाचे विकार अशा घातक आजारांच्या विळख्यात सापडण्याची शक्यता बळकावल्यामुळे सेंद्रिय आणि नैसर्गिक भाजीपाला,  फळे अन्नधान्य  मध,  दूध यासारख्या आहाराच्या वापराकडे जनतेचा कल वाढला आहे. यामुळे सेंद्रिय कृषीमालाला चांगले दिवस येत असल्याचे चित्र आहे. तसेच  शेतकरी मोठ्याप्रमाणात सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत.

सेंद्रिय शेती करणार्‍या मोठ्या देशांच्या क्रमवारीत आपला देश अव्वल क्रमांकावर चालला आहे. सेंद्रिय शेतीतील सर्वाधिक उत्पादन मध्यप्रदेशात होते तर केरळमधील मसाल्यामध्ये  रासायनिक घटक आढळत नसल्याचा दावाही करण्यात आला आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारात सेंद्रिय उत्पादनाला 80 टक्के मागणी  असल्याची माहिती कृषी खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  तालुक्यात मोठ्याप्रमाणात ऊस आणि भाताचे उत्पादन  घेण्यात येते. याबरोबर पूर्वभागात हळद, आले, पालेभाज्या आणि डाळी आदींचे उत्पादन घेण्यात येते. पीक  लवकर आणि टुमदार मिळावे या आशेने शेतकरी मोठ्याप्रमाणात रासायनिक खत तसेच कीटकनाशकांचा उपयोग प्रमाणापेक्षा जास्त करतात.

पण असे अन्नधान्य आणि भाजीपाला शरीराला हानीकारक असल्याचे स्पष्ट होत आहे. याबरोबरच जमिनीचा पोत किंवा उत्पादन क्षमताही कमी होताना दिसते. ही बाब शेतकर्‍यांच्या लक्षात आल्यानंतर येथील शेतकर्‍यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करुन सेंद्रिय शेतीकडे वळले असल्याचे दिसते. या शेतीपध्दतीला कमी खर्च लागत असल्याचे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात नव्हता. आतामात्र जास्त उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात शेतकरी रासायनिक घटकांचा भडीमार पिकांवर करत असल्याने अन्नसाखळीच बिघडण्याची परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार आही

सेंद्रिय बाजारपेठेची गरज

सेंद्रिय उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांनी कृषीमाल थेट बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. यातून त्यांना त्यांना समाधानकारक आर्थिक लाभही होईल आणि ग्राहकांना उत्तम भाजीपाला अथवा फळेही मिळणे शक्य होईल. किडनाशक औषधे कृत्रीमरित्या बनवलेली असतात. त्यांचे जैविक विघटन होते. मात्र निसर्गात विलीन होत नाहीत. त्यांचे विघटन होऊन दुसरेच विषारी घटक तयार होतात. जे सजीवांना घातक ठरतात. कोणतेही रासायनिक औषध पिकावर फवारल्यानंतर त्याचा प्रभाव 8-10 दिवस राहून त्याचे इतर घटकात विघटन होते. त्याच्या घिटनातून निर्माण होणारे घटक कर्करोगासारख्या जीवघेण्या रोगाला आमंत्रण देतात. यावर विचार होण्याची आज गरज आहे. तसेच बिनविषारी किंवा सेंद्रिय शेतीला महत्व देवून पारंपरिक शेतीपध्दती काही प्रमाणात अनुसरणे गरजेचे आहे.

प्रोत्साहनाची गरज

रासायनिक खताप्रमांणे यापुढे शेणखतही आयात करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. रासायनिक खतांनी जमीन बिघडवून टाकली आहे. तसेच रुग्नांची संख्यादेखील वाढत आहे. समृध्द शेती असूनसुध्दा येथील शेतकर्‍यांच्या वाट्याला मात्र द्रारिद्य्राने जखडले आहे. त्याकरिता हजारो रुपये औषधांवर खर्च करण्यापेक्षा सिेंद्रय शेतीला आणि पर्यायाने संबंधित शेतकर्‍याला प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे.