Wed, Oct 28, 2020 10:58होमपेज › Belgaon › कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

Last Updated: Aug 03 2020 9:12AM

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पाबंगळूर : पुढारी ऑनलाईन

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यासह त्यांच्या मुलगीचा चाचणी अहवाल देखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

वाचा : गणपतीत गावी जाणार्‍या कोकणवासीयांसमोर ई-पासचे विघ्न

आपला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी ट्विट करुन दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आपण हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी क्वांरटाईन व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

वाचा : पोलिस बनले डॉक्टर, अडकला बिल्डर

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना सध्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती मणिपाल हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे.

वाचा : धक्कादायक : बेळगाव शहरातच 51 बळी

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे गृह कार्यालय कृष्णा येथील काही कर्मचार्‍यांना याआधी कोरोनाची लागण झाली होती. यामुळे येडियुराप्पा यांनी स्वतःला होम क्‍वारंटाईन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील टेलिफोन ऑपरेटर, दोन एस्कॉर्ट, स्वयंपाकी, कारचालकासह दहाजणांना कोरोनाची लागण झाली आहे.
 

 "