Sat, Aug 08, 2020 14:05होमपेज › Belgaon › वनखाते शहरात लावणार ३,३३६ झाडे

वनखाते शहरात लावणार ३,३३६ झाडे

Published On: Jun 25 2019 1:30AM | Last Updated: Jun 24 2019 8:48PM
बेळगाव : प. य. पालकर

वनखात्याने गतवर्षी 27 लाख 44 हजार 989 वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. ते 95 टक्के पूर्ण केले. यंदा वनखात्याने 3336 झाडे शहरात विविध ठिकाणी लावण्याची मोहीम जागतिक पर्यावरण दिन 5 जूनपासून सुरु केली आहे. यंदा क्लब रोडवरील ह्यूम पार्कमध्ये रोपे विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील विविध संस्थांनीदेखील यंदा झाडे लावून पर्यावरण र्‍हास थांबविण्यासाठी पावले उचलली आहेत. 

पावसाळ्याच्या सुरुवातीला वन खात्याने रोप लागवडीचा उपक्रम हाती घेतला. जिल्ह्यात 2,682 एकर क्षेत्रात 26 लाख 76 हजार झाडे वनखात्याच्या जमिनीत लावली आहेत. बेळगाव, खानापूर, हुक्केरी, गोकाक तालुक्यात पावसाळ्यात सर्वाधिक झाडे लावली आहेत. यामध्ये औषधी गुणधर्माच्या जातीची झाडे लावण्यावर भर दिला आहे. कडुनिंब, आवळा, हरडा,  पेरु, चंदन या झाडांबरोबरच  साग, शिसम, बांबू, काजू या झाडांचादेखील समावेश आहे.  खानापूर तालुक्यात भीमगड अभयारण्यात 190 चौ. किमी क्षेत्रात घनदाट जंगल राखीव आहे.  बेळगाव विभागासाठी 13 वनक्षेत्रपाल व इतर कर्मचारी आहेत. 28 विभागात 118 बीट आहेत. गोकाकमध्ये 8 वनाधिकारी 29 विभाग असून 55 बीट, बागलकोटमध्ये 7 वनाधिकारी असून 38 विभागात 57 बीट आहेत. विजापुरात 6 वनाधिकारी असून 13 विभागात 24 बीटमध्ये काम चालते.  वनखात्याने बॉक्साईट रोडवरील 18 झाडांचे पिरनवाडी तलावाशेजारी प्रत्यारोपण केले आहे. झाडे तोडण्यापेक्षा ती जगवण्याचा वनखात्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.बेळगाव : प. य. पालकर वनखात्याने गतवर्षी 27 लाख 44 हजार 989 वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. ते 95 टक्के पूर्ण केले. यंदा वनखात्याने 3336 झाडे शहरात विविध ठिकाणी लावण्याची मोहीम जागतिक पर्यावरण दिन 5 जूनपासून सुरु केली आहे. यंदा क्लब रोडवरील ह्यूम पार्कमध्ये रोपे विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील विविध संस्थांनीदेखील यंदा झाडे लावून पर्यावरण र्‍हास थांबविण्यासाठी पावले उचलली आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला वन खात्याने रोप लागवडीचा उपक्रम हाती घेतला. 

जिल्ह्यात 2,682 एकर क्षेत्रात 26 लाख 76 हजार झाडे वनखात्याच्या जमिनीत लावली आहेत. बेळगाव, खानापूर, हुक्केरी, गोकाक तालुक्यात पावसाळ्यात सर्वाधिक झाडे लावली आहेत. यामध्ये औषधी गुणधर्माच्या जातीची झाडे लावण्यावर भर दिला आहे. कडुनिंब, आवळा, हरडा,  पेरु, चंदन या झाडांबरोबरच  साग, शिसम, बांबू, काजू या झाडांचादेखील समावेश आहे.