Sat, Aug 08, 2020 14:09होमपेज › Belgaon › ‘आमचं ठरलंय’चा झाला खुबीने वापर

‘आमचं ठरलंय’चा झाला खुबीने वापर

Published On: Apr 23 2019 1:33AM | Last Updated: Apr 22 2019 9:14PM
प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक प्रचारात सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांडून  कॅचलाईनचा खुबीने वापर करण्यात आला. कॅचलाईनमध्ये कमी शब्दात मोठा अर्थ दडल्याने प्रचारात याचा मोठा प्रभाव पडला आहे. गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत ‘अब की बार मोदी सरकार’ या कॅचलाईनने प्रचारात धुमाकूळ घातला होता. यानंतर बरेच दिवस ही कॅचलाईन गाव पातळीवरच्या  निवडणुकांत या-ना त्या संदर्भाने वापरली गेली. येथील म. ए. समितीने निवडणूक लढविण्याचे ठरविल्यापासून ‘आमचं ठरलंय’ अशी कॅचलाईन प्रचलित करुन आपल्या भूमिका चर्चेत ठेवल्या. कोल्हापूर येथे महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने ‘आमचं ठरलंय’ अशी तयार केलेली कॅचलाईन सीमाभागातही फेमस ठरली आहे.

अशा कॅचलाईन, स्लोगन, व्हीडीओ पाहून अनेकांची करमणूक होत आहे. या माध्यमातून प्रतिस्पर्धी उमेदवार कोणत्या कारणाने दुबळा आहे, हे ही ठासून सांगितले जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचा डीपी

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने प्रचलित केलेले ‘आमचं ठरलंय’ या कॅचलाईनवर राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी ‘मी बी ध्यानात ठेवलंय’ अशी कॅचलाईन देऊन समाचार घेतला. यावर सीमाभागातही मोठी चर्चा होत आहे. ही कॅचालाईन येथील काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या डीपीवर आली आहे.