Fri, Aug 14, 2020 12:58होमपेज › Belgaon › बेळगाव दंगल प्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा दाखल

बेळगाव दंगल प्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा दाखल

Published On: Dec 19 2017 11:05PM | Last Updated: Dec 19 2017 11:05PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

काल सोमवारी रात्री खडक गल्ली, जालगार गल्ली, खडे बाजार परिसरात झालेल्या जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी पोलिसांनी आज (मंगळवार) सायंकाळपर्यंत दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

सुमित गायकवाड, शुभम शंकर कंग्राळकर, गणपती नंद्गडकर, संजय जाधव, शिवाजी जाधव, शुभदा जाधव, स्वरांजली जाधव, प्रसाद इंद्रकुमार शिरोळकर, शुभम गुलबकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्‍यांची नावे आहेत. पोलिसांनी आय. पी. सी. कलम १४३, १४७, १४८, १५३अ, ५०४ आणि ५०६ अन्वये दोन धर्मिक तेढ निर्माण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, गटाने मारामारी करणे असे गुन्हे नोंदवले आहेत.