Wed, May 19, 2021 05:17
बेळगाव जिल्ह्यात दिवसात १३२० रुग्ण, २९४ मुक्‍त

Last Updated: May 06 2021 2:27AM

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनाचा महाविस्फोट झाला असून आतापर्यंतचा सर्वात मोठा संसर्ग मंगळवारी झाला. जिल्ह्यात तब्बल 1320 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये बेळगाव शहरात 387 आणि तालुक्यात 153 जणांना बाधा झाली आहे. त्यामुळे आरोग्य खाते चिंतेत आले आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव शहरात आतापर्यंत सर्वाधिक 387 जणांना बाधा झाली आहे. त्यामध्ये अनगोळ, आदर्शनगर, अलारवाड, अमननगर, आझमनगर, अशोकनगर, अंजनेयनगर, ऑटोनगर, बसव कॉलनी, बसवण कुडची, बसवाण गल्‍ली, भाग्यनगर, भांदूर गल्‍ली, बुडा कॉलनी, कॅम्प, हनुमाननगर, हिंडाल्को, हिंदवाडी, जाधवनगर, केएचबी कॉलनी, कामत गल्‍ली, कणबर्गी, कपिलेश्‍वर कॉलनी, केेशवनगर, कोनवाळ गल्‍ली, केएलई रूग्णालय, आरसीनगर, रयत गल्‍ली, रूक्मिणीनगर, एस. व्ही. कॉलनी, सदाशिवनगर, सपार गल्‍ली, साई कॉलनी, संभाजी रोड, समर्थनगर, संगमेश्‍वर नगर, कोरे गल्‍ली, लक्ष्मी टेक, महांतेशनगर, माळमारूती, माळी गल्‍ली, मार्केट यार्ड, मृत्यूंजय नगर, गुरूप्रसाद कॉलनी, फुलबाग गल्‍ली, व्दारकानगर, क्‍लब रोड, शाहूनगर, टिळकवाडी, रामतीर्थनगर, पोलिस मुख्यालय आदी ठिकाणी कोरोना रूग्ण सापडले आहेत. हलगा, आंबेवाडी, अंकलगी, सांबरा, कंग्राळी बीके, काकती, बस्तवाड, नंदिहळ्ळी, खादरवाडी, हिरेबागेवाडी, उचगाव, गणेशपूर, शिंदोळी, हलगीमर्डी, केदनूर, होनगा, कंग्राळी केएच, मोदगा, पंतबाळेकुंद्री, मच्छे, तुरमुरी, कडोली, येळ्ळूर या ठिकाणी 153 कोरोना रुग्ण सापडले आहेत. 

जिल्ह्यात सध्या 4033 जणांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात 294 जणांनी कोरोनावर मात केली, तर आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये गोकाक, खानापूर आणि बेळगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 363 वर पोचला आहे.