Sat, Aug 15, 2020 12:27होमपेज › Aurangabad › जेईई मेन्समध्ये औरंगाबादची समीक्षा चंडालिया राज्यात प्रथम

जेईई मेन्समध्ये औरंगाबादची समीक्षा चंडालिया राज्यात प्रथम

Published On: May 15 2019 6:12PM | Last Updated: May 15 2019 6:09PM
औरंगाबाद : प्रतिनिधी

जेईई मेन्स या प्रवेश परीक्षेतील प्रश्नपत्रिका दोनचा निकाल बुधवारी (दि.१५) जाहीर झाला. वास्तूविशारद (आर्किटेक्चर) अभ्यासक्रमासाठीच्या या परीक्षेत महाराष्ट्रात औरंगाबादच्या गरखेडा परिसरातील समीक्षा कांतिलाल चंडालिया हिने प्रथम क्रमांक पटकावून ऑल इंडिया रॅकिंग मध्ये ७४ वे स्थान मिळवले आहे.

'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. जानेवारी आणि एप्रिल अशी दोन्ही वेळा ही परीक्षा झाली. या दरम्यान, दोन परीक्षांमधील सर्वोत्तम गुणच पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. घाटीतील औषधशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. के. सी. चंडालिया यांनी ती कन्या आहे. ऑल इंडिया रॅकिंगमध्ये तिने ७४ व्या क्रमांकावर आहे. तिने जानेवारीत झालेल्या परीक्षेत ९९.९७  टक्के मिळवले होते. त्यामुळे तेच तिचे सर्वोत्तम गुण ग्राह्य धरण्यात आलेले आहे. 

राजबाजार परिसरात राहणारी समीक्षाचे वडील डॉक्टर असताना ही तिने स्वतःचे असे वेगळे प्रोफेशन निवडले. नियमित अभ्यासाने मिळालेले हे यश असल्याचे तिने  सांगितले. तर आवडत्या सर्वोत्कृष्ट संस्थेत अॅडमिशन मिळेल त्याचा आनंद असल्याचे सांगताना तिच्यासाठी आई वडील व शिक्षकांनी केलेल्या मेहनत आणि सहकार्याबद्दल आभारही व्यक्त केले. महाराष्ट्र पब्लिक स्कूलची ती विद्यार्थिनी आहे.