Fri, Oct 02, 2020 00:19होमपेज › Aurangabad › गल्‍ले बोरगाव जवळ ट्रक दुचाकीचा अपघात; दोन ठार

गल्‍ले बोरगाव जवळ ट्रक दुचाकीचा अपघात; दोन ठार

Published On: Dec 06 2017 1:58AM | Last Updated: Dec 06 2017 1:58AM

बुकमार्क करा

खुलताबाद : प्रतिनिधी

तालुक्यातील गल्‍ले बोरगाव येथील पेट्रोल पंपाजवळ झालेल्या ट्रक-दुचाकीच्या जबरदस्त धडकेत एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. आजिनाथ काशिनाथ निकम, शंकर पांडुरंग नीळ (वय 32 वर्षे रा.आंबा उपळा ता. कन्नड हल्‍ली मुक्‍काम बजाजनगर औरंगाबाद) अशी अपघातात मृत झालेल्या तरुणाची नावे आहेत.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दि. 5 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक टी. एन. 52 जे 0497 हा कन्नडकडून औरंगाबादकडे जात होता, दुचाकी क्रमांक एम.एच.10 इ.एच 9912 वरून आजिनाथ निकम व शंकर नीळ औरंगाबादहून कन्नडकडे जात असताना गल्‍ले बोरगाव येथील पेट्रोल पंपाजवळ दोन्ही वाहनामध्ये समोरासमोर जबरदस्त धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाला. दुसर्‍या गंभीर तरुणाला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेत असताना तो ही वाटेतच मरण पावला. अपघात एवढा भीषण होता की, त्याच्या आवाजाने पंपावर असलेले नागरिक गणेश बोडखे, राजू मानकीकर यांच्यासह नागरिकांनी धाव घेत अपघातातील जखमींना तत्काळ 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठविले. याबाबत पोलिस ठाणे तसेच महामार्ग पोलिसांना माहिती देण्यात आली होती. माहिती मिळताच महामार्ग सहायक पोलिस निरीक्षक नामदेव चव्हाण, एएसआय लक्ष्मण माळी, राठोड, बळी, शरद दळवी यांनी घटनास्थळी येऊन दोघांना खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.

लताबाद पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली असून पोलिस निरीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास बिटजमादार वाल्मिक कांबळे, बाबासाहेब थोरात हे करीत आहे.