Wed, May 19, 2021 04:49
औरंगाबाद : नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत गेली, त्यानेही सोडल्यावर रेल्वे रुळावर बसली

Last Updated: Apr 29 2021 7:21AM

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

दोन लेकरांचा असलेला सुखी संसार सोडून एका तरुणाच्या प्रेमाला भाळून सव्वीस वर्षीय विवाहिता त्याच्यासोबत गेली. पण, त्यानेही फसविल्यावर जगण्याची उमेद सोडून ती सरळ रेल्वे रुळावर जाऊन बसली. ही माहिती दामिनी पथकाला समजताच त्यांनी वेळीच धाव घेऊन तिचा जीव वाचविला. बुधवारी संध्याकाळी शिवाजीनगर रेल्वे पटरीवर हा प्रकार घडला.

अधिक वाचा : राज्यात जूननंतरच मिळणार लसीकरणाला गती!

दामिनिकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर रेल्वे पटरीवर बऱ्याच वेळेपासून महिला बसलेली आहे, अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. उपायुक्त मीना मकवाना, निरीक्षक किरण पाटील यांनी तत्काळ दामिनी पथकाच्या निर्मला निंभोरे, श्रुती नांदेडकर आणि शीतल मुठे, प्रियंका सरसांडे यांना तिकडे जाण्याचे आदेश दिले. तेव्हा गीता (बदलेले नाव) रेल्वे रुळावर रडत बसली होती. तिची समजूत घालून तिला पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नेले. तिथे तिच्याशी उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, अंमलदार निंभोरे यांनी संवाद साधला असता, ती विवाहित असून तिला अनुक्रमे आठ व चार वर्षांची दोन मुले आहेत. पती एमआयडीसी वाळूज परिसरात कामाला असून वादामुळे त्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 

अधिक वाचा : मास्क कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर सोडले कुत्रे; एक पोलिस जखमी

गीताचे त्याच दरम्यान अजिंक्य नामक तरुणासोबत प्रेम जुळले. त्याच्या म्हणण्यानुसार तिने पती, मुले, आई वडिलांना सोडले. परंतु, नंतर अजिंक्यने तिला फसवणूक करून सोडून दिले. आपल्याकडून चूक झाली, हे लक्षात आल्यावर घरी जाण्याऐवजी तिने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. पोलिसांनी तिला विश्वास देत सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले. तसेच आत्महत्येचा विचार सोडून देण्यासाठी मार्गदर्शन केले.