Sun, Sep 20, 2020 10:13होमपेज › Aurangabad › औरंगाबादेतील कोरोना मृत्यूचे सत्र सुरूच, आणखी दोन वृद्धांचा मृत्यू 

औरंगाबादेतील कोरोना मृत्यूचे सत्र सुरूच, आणखी दोन वृद्धांचा मृत्यू 

Last Updated: May 26 2020 9:10AM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

घाटीत उपचार सुरू असलेल्या आणखी दोन वृद्धांचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. या दोन्ही मृत्यूनंतर औरंगाबादेतील कोरोना बळींची संख्या ५८ वर गेली आहे.

जयभीमनगर येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्णांचे कोरोनामुळे २६ मे रोजी १ वाजून ५० मिनिटांनी मृत्यू झाला. चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयातून उपचार घेत असताना २४ मे रोजी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याच दिवशी रुग्णाला घाटीत दाखल करण्यात आले होते. भरती प्रसंगी रुग्णाची प्रकृती गंभीर होती. मधुमेह, बीपी आदी व्याधी असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला. अखेर उपचार दरम्यान मृत्यू झाला. 

जाधववाडी येथील ५७ वर्षीय पुरुष रुग्णाचा २६ मे रोजी रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी मृत्यू झाला. सदर रुग्णाला १८ मे रोजी घाटीच्या कोव्हिडं वॉर्डच्या कक्ष सहा मध्ये करण्यात करण्यात आले होते. त्यांना छातीचा व मेंदूचा क्षयरोग आणि आरव्हीडी या आजारांनी ग्रासलेले होते. १९ मे रोजी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आधीच्या व्याधींमुळे प्रकृती गंभीर बनली. अखेर सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

 "