Mon, Aug 10, 2020 21:14होमपेज › Aurangabad › आज शहर बंद

आज शहर बंद

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 03 2018 12:47AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

 शौर्य यात्रेवर दगडफेक करण्यात आल्याच्या निषेधार्थ बुधवारी (दि. 3) भारत बंद पुकारण्यात आला आहे. हा बंद शांततेत यशस्वी करावा, असे आवाहन आंबेडकरवादी, परिवर्तनवादी, धर्मनिरपेक्ष व पक्ष संघटनांनी केले आहे. तसेच याच पार्श्‍वभूमीवर 8 जानेवारी रोजी क्रांतीचौक ते भडकलगेटपर्यंत सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  मंगळवारी भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालय खोकडपुरा येथे डाव्या, आंबेडकरवादी तसेच मराठा संघटनांची संयुक्‍त बैठक रामभाऊ पेरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत घटनेला जबाबदार असणार्‍यांवर तत्काळ कारवाई करावी, तसेच या घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या बैठकीत शिवानंद भानुसे, विजय काकडे, संजय कुंटे पाटील, सुनील कोटकर, अप्पा कुडेकर, अंकत चव्हाण, सखाराम काळे,  ज्ञानेश्‍वर गायकवाड, मनोज गाये, डॉ. भालचंद्र कानगो, प्रा. राम बाहेती, भास्कर लहाने, भगवान भोजने, रमेशभाई खंडागळे, बुद्धप्रिय कबीर, संघपाल भारसाकळे, प्रा. भारत सिरसाट, उमाकांत राठोड, अमित भुईगळ, भारत दाभाडे, अय्यास शेख, संग्राम कोरडे, विकास गायकवाड, सतीश निकम, देवीदास राजळे, सुनील राठोड, लोकेश कांबळे, नितीन वाव्हळे, सचिन गंडले, प्रकाश बनसोडे, भगवान रोटे, चंद्रकांत चव्हाण, अरुण दाभाडे, अभिमान भोसले, संजय अंभोरे, बाबाराय भोसले, कॉ अनिता हिवराळे, जयश्री शिर्के, कॉ. मनीषा भोळे, वि. रा. राठोड, कॉ. मधुकर खिल्लारे, मुकुल निकाळजे, कुणाल गायकवाड, अ‍ॅड. रमेश नापेड, अ‍ॅड. अभय टाकसाळ, रमेश गायकवाड, प्रदीप मगरे, सुनील शिंदे, बाबासाहेब दाभाडे, सुनील माने, सुभाष नाडे, अनिल थोरात, शिवम पाईकराव, सोमेश प्रधान, कार्तीक दाभाडे, देवीदास राजळे, गौतम लांडगे, अ‍ॅड. मनोहर टाकसाळ, मच्छिंद्र देवकर, सुभाष लोमटे, प्रकाश सुरडकर आदी उपस्थित होते.