Sun, Jan 17, 2021 11:31
औरंगाबादच्या नामांतर केल्यास स्वागतच करू : विनायक मेटे 

Last Updated: Jan 09 2021 6:07PM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा  

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावं हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. हा प्रश्न शिवसेनेने हातात घेतला होता. मागच्या पाच वर्षात ते सत्तेत होते, आता तर ते स्वतंत्र मुख्यमंत्री पदावर आहेत. त्यांना लवकरात-लवकर निर्णय घेण्यासाठी कोणीही अडविलेले नाही, त्यांनी तातडीने निर्णय घ्यावा, आम्ही त्या निर्णयाचे स्वागत करू असे शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांनी शनिवारी (दि.९) रोजी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. शिवसंग्राम पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त तापडिया नाट्यमंदिर येथील कार्यक्रमासाठी ते आले होते. 

अधिक वाचा : प्रेमाच्या आड येणाऱ्या मित्राला मित्रानेच संपवले; सहा महिन्यांनी भलत्याच कारणाने घटना उघडकीस!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या नामांतराला विरोध केला आहे याबाबत विनायक मेटे यांनी विचारले गेले. त्यावेळी त्यांनी मग त्यांना विचारले पाहिजे की, त्यांचा छत्रपती संभाजी महाराजांना विरोध आहे का? असे सांगितले. याशिवाय काँग्रेसचा संभाजी महाराजांना विरोध आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी  उपस्थित केला आहे. 

अधिक वाचा : महिलांना भारतीय लष्करामध्ये भरतीचा चान्स; भरती प्रक्रिया पुण्यात 'या' तारखेपासून होणार!

यानंतर ते पुढे म्हणाले की, नामांतराच्या प्रश्नावरून सरकार कोसळणार नाही, गुळाला जसे मुगळे चिकटतात, तसे हे तिन्ही पक्ष एकमेंकासोबत आहेत, यातून कुणीही बाहेर पडणार नाही. सरकार त्यांच्या कर्मानेच पडेल. यानंतर त्यांना सरकार पाडण्यासाठी भाजप काय कर्मकांड करत आहे असे विचारले असता ते कर्मकांडांत जास्त व्यस्त असतात असा खोचक चिमटाही विनायक मेटे यांनी यावेळी मारला.