Wed, Aug 05, 2020 19:15होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : शेजाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या 

औरंगाबाद : शेजाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या 

Last Updated: Jul 07 2020 7:37AM

संग्रहित छायाचित्रऔरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

शेजाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून म्हाडा कॉलनीतील ५४ वर्षीय महिलेने सोमवारी (ता.६) गळफास घेतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. उषा विजय गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. जालना येथील रेशीम उद्योग महामंडळात कार्यरत असलेल्या निवृत्त विजय गायकवाड यांच्या त्या पत्नी होत्या. 

अधिक वाचा : मकबरा, लेणी तूर्तास बंदच राहणार

चिकलठाणा येथील एका कंपनीत काँट्रॅक्ट बेसिसवर विजय गायकवाड काम करतात. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांची १७ वर्षीय मुलगी घरी आली. त्यावेळी तिने विजया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पाहिले. त्यानंतर विजया यांना घाटी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गायकवाड कुटुंबियांच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया क्रांती चौक पोलिस ठाण्यात सुरू होती. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक संदीप शिंदे करत आहेत.