Sun, Sep 20, 2020 09:40होमपेज › Aurangabad › औरंगाबादेतील हर्सुल कारागृहात २९ कैद्यांना कोरोना

औरंगाबादेतील हर्सुल कारागृहात २९ कैद्यांना कोरोना

Last Updated: Jun 06 2020 8:39PM

संग्रहित छायाचित्रऔरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

मुंबई, पुणे सोलापूरनंतर आता औरंगाबादेतील हर्सुल मध्यवर्ती कारागृहातही कोरोनाचा फैलाव झाला आहे. कारागृहात शनिवारी एकाच दिवसात २९ कैद्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात ४ कच्चे आणि २५ कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचा समावेश असून, कारागृहात नियमितपणे फळ, भाजीपाला आणि अन्नधान्य पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ही बाधा झाली असावी, असा संशय जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आठवडाभरापूर्वीच दोन कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे कारागृहातील कोरोनाबाधित कैद्यांची संख्या ३१ वर गेली आहे.  

वाचा :  औरंगाबादमध्ये ६८६ रुग्णांवर उपचार सुरू; आज ९० रुग्णांची वाढ 

राज्यातील विविध कारागृहातही कोरोनाने प्रवेश केला आहे. यात हर्सुल कारागृहाचाही समावेश असून, दोन आठवड्यांपूर्वीच या कारागृहात पहिला रुग्ण अढळून आला होता. शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला कुणाकडून बाधा झाली, याबाबत शोध सुरू असतानाच पुन्हा दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच दोन दिवसांपूर्वी आणखी एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे प्रशासनाने या कैद्याच्या संपर्कातील इतर ११० कैद्यांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोग शाळेकडे पाठविले होते. तर या सर्व कैद्यांना किलेआर्क येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केले होते. 

या ११० कैद्यांपैकी शनिवारी २५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरीत चार जण हे विविध पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधून कारागृहात आणण्यात आलेले कच्चे कैदी आहेत. या कैद्यांसाठी एसबीओ शाळेत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तपासणी केल्यानंतरच त्यांना कारागृहता सोडण्यात येत आहे. दरम्यान ज्या २५  कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यासर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

वाचा :औरंगाबाद : विजेचा शॉक लागून जवानाचा मृत्यू 

 "