Wed, Aug 05, 2020 19:40होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : जन्मठेपेतील गुन्हेगाराकडून लूटमार

औरंगाबाद : जन्मठेपेतील गुन्हेगाराकडून लूटमार

Last Updated: Jul 04 2020 8:09PM

प्रातिनिधीक फोटोऔरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा  

नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील पिंपळगाव फाटा येथे ट्रकसह साडेचार लाखांची जनावरे लुटली गेली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी (दि. ४) अवघ्या बारा तासात दोघांना गजाआड केले. आरटीओ कार्यालयातील लेखापाल खून प्रकरणातील आरोपीने ट्रकचालक व क्लिनरच्या मदतीने ही लुटमार केल्याचे चौकशीत समोर आले आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले. तो पोलिसांच्या हाती लागला नसून अद्यापही फरार आहे. तर अमजद अहमद कुरेशी (रा. बडा तकीया, नुतन कॉलनी), मंगेश प्रल्हाद पोळ (रा. गवळीपुरा, छावणी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. 

औरंगाबाद : महावितरण अभियंत्याला मारहाण

याबाबत मिळालेली माहिती अशी की, देवगाव रंगारीहून खरेदी केलेली जनावरे घेऊन दौलताबाद येथील आसाराम बाबाराव वरकड हे ट्रकने जात होते. त्यांना नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील अब्दीमंडीकडे येताना पिंपळगाव फाट्याजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडवले. त्यानंतर दुचाकी आडवी लावून तिघांनी ट्रक चालकांसह क्लिनरला बेदम मारहाण केली. तसेच जनावरांनी भरलेल्या ट्रकसह पळ काढला होता. या प्रकरणी देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत व अन्य कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवत अमजद कुरेशी, मंगेश पोळ यांना पकडले. 

औरंगाबाद : कर्ज देण्यासाठी घेतली सव्वा लाखांची लाच, जधावसह अकाऊंटंट गजाआड

सचिन तायडे जेलमधून पळालेला गुन्हेगार

सचिन तायडे याने २०१० मध्ये आरटीओ कार्यालयातील लेखापाल धर्माजी कोंडावार यांच्यावर कार्यालयात भरदुपारी गोळी झाडून हत्या केली होती. या प्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो हर्सुल कारागृहातून पसार आहे. पसार झाल्यानंतर देखील त्याने अनेक गुन्हे केले आहेत. जिल्ह्यातील बिडकीन पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यानंतर आता त्याने लुटमार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. जेलमधून पळालेल्या या आरोपीने ग्रामीण पोलिसांच्या नाकीनऊ आणले आहेत.