Tue, Sep 29, 2020 09:52होमपेज › Aurangabad › गणेशमूर्ती व पूजेचे साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांना सवलती द्या : खा. इम्तियाज जलील 

गणेशमूर्ती व पूजेचे साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांना सवलती द्या : खा. इम्तियाज जलील 

Last Updated: Aug 21 2020 1:04AM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी गणेश उत्सवानिमित्त शासनाच्या कोरोनासंबंधीच्या नियामावलीनुसार सर्व धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी तसेच गणेश भक्त, गणेश मुर्ती बनविणाऱ्या कारागीर, गणेशमुर्ती व पुजेचे साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांना विशेष सवलती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे. 

अधिक वाचा : ४० हजार वीज बिल आल्याने जीवनयात्रा संपवली

खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात नमुद आहे, गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे, त्या उत्सवानिमित्त दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची सर्वत्र रेलचेल असते. महाराष्ट्रातील गणेशमुर्ती बनविण्याचे काम करणारे कारागीर, गणेशमुर्ती व पुजेचे साहित्य विक्री करणारे छोटे-माठे व्यापारी व त्यावर अवलंबुन असलेल्या वस्तुंचा व्यापार करणारे व्यापाऱ्यांचा संपुर्ण वर्षभराचा उदरनिर्वाह हा गणेश उत्सवावरच अवलंबून असतो. अशांचा शासनाने विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.

गणेश उत्सव आनंदमय वातारवणात व्हावे व सर्वांना गणेशमुर्ती व त्यासंबंधीचे सर्व वस्तु वेळेवर व शांततामय वातावरणात उपलब्ध झाले पाहिजेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये अनेक नियम व अटी लागू आहेत. मूर्तीकारांना, मूर्ती विकणाऱ्या, पुजेचे साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांना लॉकडाऊनचे नियम शिथील करुन त्यांना विक्रीसाठी अधिक वेळ वाढवुन दिल्यास या व्यापाऱ्यांचा व्यवसाय होईल. तसेच त्या ठिकाणी गर्दी न होता सोशल डिस्टिन्सिंग नियम पाळणे सुध्दा सोपे होणार आहे. वेळ वाढवून दिल्यास आगामी काही दिवसांमध्ये कमी वेळेमध्ये अनेक गणेश भक्तांना आवश्यक असणाऱ्या गणेशमुर्ती व इतर साहित्य विकत घेणे सोपे होईल असे खासदार इम्तियाज जलील यांनी मुखमंत्री यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे. 

अधिक वाचा : यवतमाळ: सहाय्यक लेखापाल लाच घेताना जाळ्यात

महाराष्ट्रात अशा पध्दतीचे योग्य नियोजन केल्यास मोठी आर्थिक उलाढाल होऊन राज्याच्या महसुलामध्ये सुध्दा मोठी वाढ होईल. तसेच तालुकास्तरावर आणि शहरात विविध ठिकाणी गणेशमुर्ती विक्री केंद्रे, पुजेचे साहित्य व त्यासंबंधीचे छोटे व्यापारासाठी जागा व विशेष सवलती देण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. योग्य उपाययोजना केल्यास गणेश भक्तांचा आनंद व्दिगुणीत होईल. अशामुळे आणि छोट्या व्यापाऱ्यांना त्यांनी वर्षभर केलेले परिश्रम सार्थक ठरतील आणि त्यानिमित्त अधिक उत्साहामध्ये हा सण गणेश भक्तांना साजरा करता येईल.  

 "