Thu, Jan 28, 2021 05:23
औरंगाबादमध्ये कोव्हिशिल्ड लस दाखल, लातूरसाठी ६४ हजार लसीचे डोस रवाना

Last Updated: Jan 13 2021 1:04PM
औरंगाबाद  : पुढारी वृत्तसेवा

सिरम कंपनीची कोव्हिशिल्ड लस बुधवारी (दि.१३) रोजी सकाळी औरंगाबादमध्ये दाखल झाली. औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यांसाठी ६४ हजार ५०० लस उपलब्ध झाली आहे. तर लातूर विभागातील चार जिल्ह्यासाठी ६४ हजार लसीचे डोस रवाना केली आहे. 

अधिक वाचा :कॅमेऱ्याच्या हप्त्यावरून चिंचवडमध्ये वाहनांची जाळपोळ

सीरम कंपनीकडून सर्व नियंमाचे पालन करून आज कोव्हिशिल्ड लस पुण्याहून औरंगाबादमध्ये दाखल झाली आहे. सिडकोतील आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात सीरम कंपनीची कोव्हिशिल्ड लस ठेवण्यात आली आहे. या केंद्रावरुन इतर जिल्ह्यांना लस वितरीत करण्यात येणार आहे. यातील आज सकाळी लातूर विभागासाठी ६५ हजार लस रवाना करण्यात आली आहे. येत्या १६ जानेवारीपासून लस देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी शहर व ग्रामीणमधील १३ बुथवर लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच ज्यांनी या लसीकरणासाठी नोंदणी केलेली आहे त्यांनाच लस देण्यात येणार आहे. सर्व प्रक्रिया योग्यरितीने पार पाडली जाणार आहे. तसेच यासाठी प्रशासन योग्य काळजी घेत आहे. तसेच लस घेतल्यानंतरही मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर करणे, सोशल डिस्टंसिंग या नियमांचे कायम पालन करावे लागणार आहे, असे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी सांगितले आहे.

अधिक वाचा :धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वनिल लाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. अमोल गिते यांची यावेळी उपस्थिती होती.