Thu, Oct 01, 2020 17:11होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : चिखलठाणा एमआयडीसीतील सहा कंपन्यांना सील 

औरंगाबाद : चिखलठाणा एमआयडीसीतील सहा कंपन्यांना सील 

Published On: Jan 11 2019 5:26PM | Last Updated: Jan 11 2019 5:26PM
औरंगाबाद : प्रतिनिधी

मलमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी औरंगाबाद महानगरपालिकेच्या पथकाने शुक्रवारी चिखलठाणा एमआयडीसी मधील सहा बंद कंपन्यांना सील ठोकले. यामध्ये जिजाटी, औरंगाबाद आजबेस्टस सिमेंट,  गेडोर टूल्स, शिव अँमडर्स मॅन्युफॅक्चर आणि गोल्डन ड्रीमच्या दोन कंपन्यांचा समावेश आहे.

अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग आणि कर निर्धारक महावीर पाटणी यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड अधिकारी कमलाकर ज्ञाते आणि पथक प्रमुख एन व्ही विसपुते यांच्या पथकाने ही कारवाई केली.  या पथकात व्यंकट जाधव,  रमेश मोराळे, योगेश दुखले,  शेख सल्लाउद्दीन आदींचा समावेश होता