Mon, Apr 12, 2021 02:47
औरंगाबाद : दुकाने उघडू द्या; अन्‍यथा सामूहिक आत्मदहन, जिल्हा व्यापारी महासंघाचा इशारा

Last Updated: Apr 07 2021 2:06PM

औरंगाबाद :  पुढारी वृत्तसंस्था 

सरकारने व्यापाऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, नाही तर दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. त्यासाठी काही निर्बंध घालावेत, त्याची अंमलबजावणी केली जाईल. दुकाने सुरू न झाल्यास सर्व व्यापारी सामूहिक आत्मदहन करतील, असा इशारा जिल्हा व्यापारी महासंघाने दिला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमुळे व्यापारी अडचणीत आले आहेत. अजूनही व्यवसाय सुरळीत झालेला नाही. त्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे व्यापारी कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. अगोदर कर्जाचे हप्ते थकल्याने बँकांनी वसुलीचा तगादा सुरू आहे. जिल्ह्यातील हजारो दुकानांमध्ये लाखो कामगार आहेत. त्यांच्या रोजगाराचादेखील प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारने व्यापाऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, नाही तर दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. त्यासाठी काही निर्बंध घातले जावे, त्याची अंमलबजावणी केली जाईल. दुकाने सुरू न झाल्यास सर्व व्यापारी सामुहिक आत्मदहन करतील, असा इशारा देखील महासंघाने दिला आहे.

यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, प्रफुल्ल मालाची, अजय शहा, लक्ष्मण राठी, पवन साकला, आशिष बाहेती, मोहम्मद झहीर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.