Sun, Sep 20, 2020 09:26होमपेज › Aurangabad › औरंगाबादेत सकाळी सकाळी २२ कोरोना रुग्णांची भार 

औरंगाबादेत २२ कोरोना रुग्णांची भर 

Last Updated: May 26 2020 12:37PM
औंरगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळीच २२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकुण संख्या १३२७ एवढी झाली आहे. 

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये जुना मोंढा (१),  बायजीपुरा (१), रोहिदासपुरा (१), कांचनवाडी (१), भारतमाता नगर हडको (१), नवीनवस्ती जुनाबाजार (४),  जुना हनुमान नगर (१), हनुमान चौक (१), न्याय नगर (१), कैलाश नगर (१), रामनगर (१), एन ८ सिडको (४), रोशन गेट (१), एन११ सुभाषचंद्र नगर (१), पुंडलीक नगर (१), भवानी नगर (१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये ११ महिला आणि ११ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. 

सिडको एन आठ हा भाग आता डेंजर हॉटस्पॉट बनू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी याच भागात एका रुग्णांचा मृत्यू झाला होता. पुंडलीक नगर हॉटस्पॉट मध्ये मागील चार दिवसात एक ही रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र आज एका रुग्णाला लागण झाल्याने चिंता वाढली आहे.

 "