होमपेज › Arthabhan › बाजार हळूहळू स्थिरावेल!

बाजार हळूहळू स्थिरावेल!

Last Updated: Jan 20 2020 1:53AM
डॉ. वसंत पटवर्धन

गेल्या गुरुवारी निर्देशांक 41,957 होता तर निफ्टी 12,356 होता. बाजार आता स्थिरावू लागला आहे आणि 1 फेब्रुवारीला सादर होणार्‍या अर्थसंकल्पाची आतुरतेने वाट बघत आहे. व्यक्तिगत कर मर्यादेत काही बदल व्हावेत. गेल्या शुक्रवारी काही शेअर्सचे भाव असे होते.

बँक ऑफ बडोदा 97.30, एचडीएफसी बँक 1277, मिंडा इंडस्ट्रीज 391.95, डीसीबी बँक 201.85, ज्युबिलर 593.25, बंधन बँक 478.65, आरबीएल बँक 343.65, एचडीएफसी लाईफ 609.40, जीएचसीएल 214.15, अपोलो आयर 180.55, रेमंड 703.50, जे. के. टायर्स 85.70, बाळकृष्ण इंडस्ट्रीज 1115, दिलीप बिल्डकॉन 425, इंदू सिंड बँक 1353.75, स्पाइस जेट 103.7, फोर्स मोटर्स 1405.95, सिएट लि. 1023.75, रॅमको सिमेंट 819.70, महाबँक 13.50, बजाज फायनान्स 4231.25, अतुल 4337, ओबेराय रिअ‍ॅल्टी 542.25, प्राज इंडस्ट्रीज 126.10, पराग मिल्क 158.55, हिंदुस्थान पेट्रोलियम 249.75, बीपीसीएल 455.50, आयसीआयसीआय बँक 533.15.

वरील शेअर्स एसबीआय लाईफ आणि एसबीआय या शेअर्सचाही समावेश करता येईल. गेल्या काही दिवसात हे शेअर्स भरपूर वाढले असले तरी अजूनही ते गुंतवणुकीस योग्य वाटतात.
भारत सरकार येत्या अर्थसंकल्पात सर्वंकष औषधी धोरणाबद्दल काही ठोस पावले उचलेल असे वृत्त आहे. त्यामध्ये नवीन औषधांबद्दल संशोधन व विकासाबद्दल क्षेत्रात काही पावले उचलेल असे वृत्त आहे. याचा फायदा ऑरबिंदो फार्मा, ग्लेस फार्मा, सिपला, सन फार्मा या कंपन्यांना होईल.

टाटा कन्स्ल्टन्सी (ढउड) चा डिसेंबर तिमाहीचा नक्त नफा 8118 कोटी रुपये झाला. सध्या या शेअरचा भाव 2218 रुपये आहे. गेल्या बारा महिन्यांतील  कमाल व किमान भाव अनुक्रमे 2296, 1874 रुपये होते.

रिझर्व्ह बँक नागरी सहकारी बँकांवर व्यवस्थापन मंडळाच्या नावाखाली नियंत्रण घालणार आहे. हा रिझर्व्ह बँकेचा निर्णय सकृतदर्शनी योग्य वाटत असला तरी त्याचे परिणाम बघितल्यावर मतप्रदर्शन करता येईल.

व्यवस्थापन मंडळातील सदस्य हे अकौटन्सी, शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था बँकिंग, सहकार, अर्थशास्त्र, वित्त, कायदा, लघू उद्योग, माहिती तंत्रज्ञान या बाबतीत तज्ज्ञ असावे लागतील. मात्र या सर्व क्षेत्रात पुरेशा जाणकारांची उणीव आहे.

अमेरिका व चीन यांच्यामधील होऊ घातलेला व्यापार करार अनेक महिने चर्चेत होता. त्यामुळे जागतिक व्यापार थोडासा थबकला होता. आता ती चर्चा थांबली आहे व अमेरिका व चीनकडून कराराच्या पहिल्या मसुद्यावर अखेर स्वाक्षरी झाली आहे. त्यामुळे जागतिक व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढेल व त्याचा भारतातील व्यापारावर चांगला परिणाम होईल. कंपन्यांची विक्री वाढली की शेअरबाजार आपोआपच सुधारेल. 2020 वर्षअखेर निर्देशांक 45000 च्या वर जावा. निफ्टीही 13000 पर्यंत जावा.

बँकांच्या कर्जामध्ये गृहकर्जे व वाहनकर्जे यांचा मोठा वाटा असतो. गृहकर्जावरील सवलती वाढल्या तर निवासिकांच्या किंमती कमी होतील. सध्या मुंबई, पुणे अशा शहरात गेली बरीच वर्षे निवासिका पडून आहेत. बांधकामे जर वाढली तर त्याचा सिमेंट आणि पोलाद या क्षेत्रावरही अनुकूल परिणाम होईल. ब्रिगेड एन्टरप्राइझेस, ओबेरॉय रिअ‍ॅल्टी, दिलीप बिल्डकॉन या शेअर्समध्ये त्यामुळे  नवीन तेजी दिसावी. बजाज फायनान्स सध्या 4230 रुपये आहे. पुढील 15 दिवसात त्याचे डिसेंबर 2019 तिमाहीचे आकडे प्रसिद्ध झाले की तो 4500 रुपयांपर्यंत जाईल.

हा शेअर सध्या 164 रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. द. आफ्रिकेमध्ये मॅगेनीज खनिजाच्या किमती वाढत असल्यामुळे हा शेअर अजूनही वाढू शकेल. माफक प्रमाणात गुंतवणूक करायला हरकत नाही. गेल्या बारा महिन्यांतील उच्चांकी भाव 171 रुपये होता. त्याच्या जवळपास ही किंमत आली आहे. सध्या विक्री करून बाहेर पडायला हरकत नाही. किं/ऊ गुणोत्तर सध्या आकर्षक म्हणजे 9.58 असे आहे.