Wed, May 19, 2021 05:00
अर्थवार्ता

Last Updated: May 02 2021 8:38PM

प्रीतम मांडके

गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशाकांत एकूण 290 अंक व 904 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशाकांनी अनुक्रमे 14631 व 48,782 अंकांच्या पातळीवर बंदभाव दिला. निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकात एकूण अनुक्रमे 2 टक्के व 1.90 टक्क्यांची वाढ झाली.

देशातील एक प्रमुख खासगी बँक ‘अ‍ॅक्सिस बँक’ पुन्हा नफ्यात गतआर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचा नफा 2677 कोटींवर पोहोचला. तसेच निव्वळ व्याज उत्पन्‍नात (छखख) 11 टक्क्यांची वाढ होऊन उत्पन्‍न 7555 कोटींवर पोहोचले. एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) मागील तिमाहीच्या तुलनेत 85 बेसिस पॉईंटस्नी घटून 4.55 टक्क्यांवरून 3.7 टक्क्यांवर आले. निव्वळ अनुत्पादित कर्जांचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत 1.56 टक्क्यांवरून 1.05 टक्क्यांवर खाली आले. नेट इंटरेस्ट मार्जिनदेखील 3.55 टक्क्यांवरून 3.56 टक्क्यांवर पोहोचले. 

ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणारी ‘बायजू’ कंपनी सर्वांत महागडी स्टार्टअप ठरली. कंपनीचे एकूण मूल्य 16.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले. ‘युबीएस’ या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक समूहाकडून बायजूमध्ये 150 दशलक्ष डॉलर्स गुंतवले जाणार. या गुंतवणूक समूहाकडून बायजूने मूल्याच्या धर्तीवर (व्हॅल्यूएशन बेसिस) पेटीएम कंपनीला देखील मागे टाकेल. यापूर्वी बायजूने फेसबुकच्या सहसंस्थापकांकडून 1 अब्ज डॉलर्स गुंतवणूक स्वरूपात घेतले होते. अजून एक बडा गुंतवणूक उद्योग समूह बायजूमध्ये 400 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यास उत्सुक. परंतु नाव अद्याप गुप्त ठेवण्यात आले आले.

देशातील एफ.एम.सी.जी. क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’चा गतआर्थिक वर्षाचा चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर कंपनीचा नफा 41 टक्के वधारून 2143 कोटी रुपये झाला. तसेच कंपनीच्या उत्पादनांची विक्री 34 टक्क्यांनी वाढून 11733 कोटींपर्यंत पोहोचली.

खाद्यपदार्थांची घरपोच सेवा पुरवणारी ऑनलाईन कंपनी ‘झोमॅटो’ लवकरच भांडवल बाजारात उतरणार. आयपीओद्वारे 8250 कोटींचा निधी उभा करण्यासाठी कंपन प्रयत्नशील. सध्या यासाठी कंपनीने बाजारनियामक ‘सेबी’कडे अर्ज केला आहे. 2020-21 मध्ये झोमॅटोने विविध गुंतवणूकदार कंपन्यांकडून 910 दशलक्ष डॉलर्स उभे केले. सध्याचे कंपनीचे मूल्य (व्हॅल्युएशन) जवळपास 5.4 अब्ज डॉलर्स आहे. 

गतआर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत जीवनबिमा क्षेत्रातील प्रमुख कंपनी ‘एचडीएफसी लाईफ’चा नफा 318 कोटींवर पोहोचला. कंपनीने गतआर्थिक वर्षात 9.8 लाख पॉलिसी विकल्या. तसेच मागील वर्षात एकूण 3 हजार कोटींचे 2.9 लाख व्यक्‍तींचे डेथक्‍लेम पूर्ण केले. कंपनीचे व्यवस्थापन अंतर्गत भांडवलमूल्य (एयूएम) 37 टक्क्यांनी वाढून 1,73,839 कोटी झाले.

7) गत आर्थिक वर्षाचा चौथ्या तिमाहीत सरकारी बँक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चा नफा 187 टक्के वाढून 165 कोटी झाला. एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 12.81 टक्क्यांवरून 7.23 टक्क्यांवर आले. तसेच निव्वळ अनुत्पादित कर्जांचे प्रमाण 4.77 टक्क्यांवरून 2.48 टक्क्यांपर्यंत खाली आले. निव्वळ व्याज उत्पन्‍नात 35 टक्क्यांची वाढ होऊन उत्पन्‍न 1383 कोटींवर पोहोचले. कोव्हिड काळात कठीण प्रसंगांसाठी 583 कोटींची तरतूद करण्यात आली.

दुचाकी क्षेत्रातील प्रमुख कंपनी ‘टीव्हीएस मोटर्स’ चौथ्या तिमाहीत दमदार कामगिरी. नफ्यामध्ये तब्बल 292 टक्क्यांची वाढ होऊन नफा 74 कोटींवरून थेट 289 कोटींवर पोहोचला. कंपनीसाठी आतापर्यंतचा एका तिमाहीतील सर्वाधिक विक्रमी नफा ठरला. महसूल विक्रीतदेखील 53 टक्क्यांची वाढ होऊन विक्री 3481 कोटींवरून 5322 कोटींवर पोहोचली. कंपनीने व्यवसायवृद्धीच्या द‍ृष्टीने 600 कोटींची योजना आखली. लवकरच 20 नवीन शहरांमध्ये टीव्हीएसतर्फे इलेक्ट्रीक दुचाकी विकल्या जाणार.

घरगुती दुरुस्ती आणि इतर सेवा पुरवणारी ‘अर्बन कंपनी’चे मूल्य 2 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले. केवळ 7 वर्षांपूर्वी या स्टार्टअप कंपनीची स्थापना झाली होती. कंपनीने नुकतेच खासगी गुंतवणूक उद्योग समूहातील 188 दशलक्ष डॉलर्स (1410 कोटी) रुपयांची भांडवल उभारणी केली.

10) आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी टेक महिंद्रा कंपनीचा चौथ्या तिमाहीचा नफा 34.6 टक्के वधारून 1081.4 कोटी झाला. तसेच विक्री/महसुलात 2.5 टक्क्यांची वाढ होऊन विक्री 9729.9 कोटींवर पोहोचली.

11) देशातील प्रमुख चारचाकी वाहननिर्मिती करणारी मारुती कंपनीचा नफा चौथ्या तिमाहीत 9.7 टक्के घटून 1166 कोटींवर खाली आला. कंपनीची विक्री 34 टक्क्यांनी वधारून 22959 कोटींपर्यंत पोहोचली.