Sun, Jan 17, 2021 12:13




चकाकता हिरा : ‘एस. बी. आय. कार्ड’

Last Updated: Dec 13 2020 11:07PM




यावेळचा ‘चमकता हिरा’ म्हणून एस.बी.आय.कार्डचा उल्लेख करता येईल. तिच्या सर्व समभागांचे आजचे बाजारमूल्य 77,325 कोटी रुपये आहे. शेअरगणिक उपार्जन  11.88 रुपये आहे. 2022 साली शेअरगणिक उपार्जन 22,23 रुपये होण्याची शक्यता आहे. 2022 साली या शेअरचा भाव 1200 रुपयांपर्यंत जाऊ शकेल. भाग भांडवल 940 कोटी रुपये आहे. खुद्द स्टेट बँकेकडे यातले 70 टक्के शेअर्स आहेत. त्यामुळे स्टेट बँकेचा भावही वाढत राहील.

एस.बी.आय.ची क्रेडिट कार्ड खूप लोकप्रिय आहेत. 2017 साली कंपनीमध्ये ॠए कॅपिटलने भांडवल घातले. सर्व क्रेडिट कार्डापैकी 74% क्रेडिट कार्ड स्टेट बँकेची आहेत. स्टेट बँकेची आहेत. स्टेट बँकेच्या छत्राखाली हवाई प्रवास, इंधन, फॅशन, आरोग्यविषयक बाबी या आहेत. एअर इंडिया, अपोलो हॉस्पिटल्स, भारत पेट्रोलियम आय आर सी टी सी, ओला, इ. ठिकाणी या कार्डांचा भरपूर वापर होतो.

क्रेडिट कार्डात एच डी एफ सी बँक अग्रगण्य आहे. त्यानंतर एस बी आय कार्ड  दुसर्‍या क्रमांकावर येते. भारतातील एकूण क्रेडिट कार्डापैकी स्टेट बँकेची क्रेडिट कार्ड 18% आहेत. ही टक्केवारी नजीकच्या भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे या कंपनीत 2, 3 वर्षांसाठी गुंतवणूक चांगला फायदा देऊन जाईल. 

एस.बी.आय.च्या छत्राखाली अनेक बँकांनी आपली क्रेडिट कार्डे दिली आहेत. जगभर विकसित राष्ट्रांकडून क्रेडिट कार्डांचा उपयोग 80 टक्के खरेदीसाठी वापरला जातो. भारतातही यापुढे क्रेडिट कार्डाद्वारे खरेदी करण्याची शक्यता वाढीला लागेल.