Sat, Feb 27, 2021 07:24
अर्थभान : मृत्यूनंतर म्युच्युअल फंडमधील पैशांचे काय?

Last Updated: Feb 22 2021 8:09AM

जगदीश काळे

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही एकल किंवा दुकल मार्गाने देखील करता येते. तीन जणांच्या माध्यमातूनही म्युच्युअल फंडची गुंतवणूक करता येते. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर ते युनिट नॉमिनीच्या नावावर स्थानांतरित होते. युनिट ट्रान्स्फर करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते.

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही कधीही काढता येते. डिजिटल गुंतवणुकीमुळे एका क्लिकवर आपण फंडमधील सर्व पैसे काढून घेऊ शकता. म्हणूनच फंडमधील पैसे काढणे हे अतिशय सुलभ आणि सुटसुटीत मानले जाते. मात्र एका दुर्दैवी घटनांमुळे गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास पैसे काढण्याचे नियम बदलतात. परिणामी, अनेकदा नियमाअभावी गुंतवणूकदाराचे कुटुंब म्युच्युअल फंडमधील पैसे काढू शकत नाही. म्हणूनच गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास पैसे काढण्याची प्रक्रिया इथे सांगता येईल. तसेच वारशासंदर्भातील नियमदेखील इथे नमूद करता येतील. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही एकल किंवा दुकल मार्गानेदेखील करता येते. तीन जणांच्या माध्यमातूनही म्युच्युअल फंडची गुंतवणूक करता येते. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर ते युनिट नॉमिनीच्या नावावर स्थानांतरित होते. युनिट ट्रान्स्फर करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. नॉमिनी हा केवळ गुंतवणुकीचा कस्टोडियन असतो. नॉमिनीला कायदेशीर वारशाला पैसे द्यावे लागतात. शेवटी भविष्यातील गुंतवणुकीतील कायदेशीर क्लिष्टता टाळण्यासाठी प्रत्येक गुंतवणुकीला नॉमिनी देणे आवश्यक बाब ठरते. तसेच एकट्याने गुंतवणूक करण्याऐवी संयुक्तपणे गुंतवणुकीबाबत आग्रही असावे. 

ट्रान्स्फरसाठीची प्रक्रिया : दोन गुंतवणूकदारांपैकी एकाचा मृत्यू झाल्यास मृत गुंतवणूकदाराचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे लागते. या प्रमाणपत्राला गॅझेटेड अधिकार्‍याने सांक्षाकित करणे गरजेचे आहे. बँक मॅनेजरकडूनही सर्टिफिकेट अ‍ॅटस्टेड करता येते. गुंतवणूकदाराच्या नावाने कॅन्सल चेकदेखील देता येतो. बँक अकाऊंट स्टेटमेंट देखील यावेळी मान्य होईल. जीवित गुंतवणूकदाराचा केवायसी झाला नसेल तर फॉरेन अकाऊंट टॅक्स कंप्लायन्स अ‍ॅक्ट आणि कॉमन रिपोर्टिंग स्टँडर्डची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंड डिमॅटमध्ये असतील, तर म्युच्युअल फंडचे युनिट डिमॅट खात्यात असतील, तर अशा स्थितीत ट्रान्स्फरची प्रक्रिया समान असेल. केवळ डिमॅटची कागदपत्रे वेगळी असतील. जर क्लेम दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर क्लेमसाठी नोटरी केलेली विलची कॉपी, कायदेशीर वारस असलेले प्रमाणपत्र, कोर्टकडून जारी केलेले सर्टिफिकेट जमा करावे लागेल. त्याचबरोबर एफएटीसीए, सीआरएसला संपूर्ण माहिती सादर करावी लागेल. 

सर्व गुंतवणूकदारांचा मृत्यू झाल्यास : जर सर्व सह गुंतवणूकदारांचा मृत्यू झाल्यास नॉमिनीच्या क्लेमसाठी रिक्वेस्ट लेटर द्यावे लागेल. त्याचबरोबर मृतकांचे डेथ सर्टिफिकेट सादर करणे गरजेचे आहे. सर्टिफिकेटला गॅझेटेड अधिकार्‍याकडून साक्षांकित करणे आवश्यक आहे. बँक मॅनेजरकडूनही सर्टिफिकेट साक्षांकित करून घेता येते. नॉमिनीसाठी केवायसीदेखील करणे गरजेचे आहे. यासाठी एफएटीसीए आणि सीआरएसची माहिती सादर करणे आवश्यक आहे. 

नॉमिनी नोंदलेला नसेल तर : नॉमिनीला क्लेसाठी रिक्वेस्ट लेटर सादर करावे लागेल. यानुसार मृत गुंतवणूकदाराचे डेथ सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे. सर्टिर्फिकेटला गॅझेटेड अधिकार्‍यांकडून अ‍ॅटेस्टेड करावे लागते. बँक मॅनेजरकडून देखील अ‍ॅटेस्टेड करता येते. नॉमिनीसाठी केवायसी आवश्यक आहे. कायदेशीर उत्तराधिकारी होण्यासाठी बाँड अ‍ॅनेश्चर 31, कायदेशीर वारशासाठी व्यक्तिगत शपथपत्र अ‍ॅनेक्श्चर 41 द्यावे लागेल. दोन लाखांपेक्षा कमी रक्कम असेल तर नाते सिद्ध करावे लागेल. दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम असेल तर कागदपत्रे सादर करावी लागतील.