Sun, Sep 20, 2020 10:54होमपेज › Ahamadnagar › मुंबईवरून संगमनेरला आलेल्या महिलेचा कोरोनाने मृत्यू 

मुंबईवरून संगमनेरला आलेल्या महिलेचा कोरोनाने मृत्यू 

Last Updated: May 26 2020 8:30AM
संगमनेर :पुढारी वृत्तसेवा 

मुंबईहून संगमनेर शहरात आलेल्या ६६ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे संगमनेर तालुक्यात कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या चारवर जाऊन पोहचली  आहे.  

मुंबईच्या विक्रोळी येथील रहिवाशी असलेली ६६ वर्षीय महिला शनिवारी संगमनेर शहरात आली होती. तिला जास्त प्रमाणात त्रास  होत असल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी शहरातील देवी गल्लीतील एका खाजगी रुग्णालयात दाखवले होते. डॉक्टरांनी  तपासणी केली असता तिला काही  प्रमाणात कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यानंतर डॉक्टरांनी तिला तात्काळ अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले.  

त्या महिलेची तपासणी केल्यानंतर तिचा स्त्राव घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. त्यात ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अढळून आले. त्यानंतर तिच्यावर जिल्हा रुग्णालयातच  उपचार सुरू होते. पण, दुर्दैवाने सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तिचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला. त्यामुळे आता संगमनेरमधील कोरोनामुळे मृत्यू होणार्यांची संख्या ४ वर पोहचली आहे. 

 "