Mon, Sep 28, 2020 08:23होमपेज › Ahamadnagar › संगमनेर : टेम्पो पलटी होऊन कापसाखाली दबल्याने तिघांचा मृत्यू

संगमनेर : टेम्पो पलटी होऊन कापसाखाली दबल्याने तिघांचा मृत्यू

Last Updated: Dec 15 2019 1:24AM

संग्रहित छायाचित्रसंगमनेर : प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथून कापूस भरून ओझर मार्गे अश्विकडे जात असणाऱ्या रस्त्यावर भरलेला टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील तीन कामगार जागीच ठार झाल्याची घटना आज गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

शेख परवेज नासिर (वय 19), परवेज भिकन शेख (वय 17) आणि फरमान हारुण बागवान (वय 18, रा. जामनेर, ता. जामनेर, जि. जळगाव ) अशी अपघातात ठार झालेल्या तीन जणांची नावे आहेत. याबाबत अश्वि पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की संगमनेर तालुक्यातील आश्वी नजीक असणाऱ्या हंगेवाडी येथून टेम्पोत कापूस भरुन कच्च्या रस्त्याने ओझर अश्विच्या दिशेने जात असताना अचानक कापसाने भरलेला टेम्पो पलटी झाला असता टपावर बसलेले तिन्ही कामगावर टम्पो पडून ते कापसाखाली दबले गेले.

टेम्पो खाली दबलेल्या तिन्ही मजूरांना स्थानिक नागरिकांनी टेम्पो बाजूला टेम्पो बाजूला काढले. तत्काळ त्या तिघांना घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र या तिघांचा मृत्यू झाला असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी जाहीर केले

 "