Fri, Feb 26, 2021 06:23
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणूक : माजी मंत्री शिवाजी कर्डिले, उदय पिसाळ विजयी

Last Updated: Feb 21 2021 9:44AM

अहमदनगर : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील तीन जागांवर माजी मंत्री शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे उदय शेळके व विखे गटाचे अंबादास पिसाळ हे विजयी झाले. उदय शेळके व शिवाजी कर्डिले यांनी एकतर्फी विजय मिळवला.

पारनेर मतदारसंघातून उदय शेळके यांना 105 पैकी तब्बल 99 मध्ये मिळाली. विरोधी असलेल्या शिवसेनेच्या भोसले यांना अवघी 6 मते मिळाली. नगर तालुका मतदारसंघातून 109 मतदारांपैकी शिवाजी कर्डिले यांना 94 मते मिळाली, तर सत्यभामाबाई बेरड यांना 15 मते मिळाली. या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांचा एक तर्फी विजय झाला.

कर्जत मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे जोरदार चुरस दिसून आली. विखे गटाच्या अंबादास पिसाळ यांना 37 मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या मीनाक्षी साळुंके यांना 36 मते मिळाली. साळुंके यांच्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठी ताकद लावली होती. त्यांना अवघ्या एका मताने पराभवाचा सामना करावा लागला. बिगर शेती संस्था मतदारसंघातील मतमोजणी सुरु आहे.