Wed, May 19, 2021 04:17होमपेज › Ahamadnagar › म्हणून माझं राष्ट्रवादीनं तिकीट कापले; सुजय विखेंचा खुलासा

म्हणून माझं राष्ट्रवादीनं तिकीट कापले; सुजय विखेंचा खुलासा

Last Updated: Nov 15 2020 1:45AM
नगर: पुढारी ऑनलाईन

मागील जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी हेलिकॉप्टरने फिरत आपल्या उमेदवाराचा हवाई प्रचार केला होता. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. मात्र, याच हेलिकॉप्टरमुळे माझे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे लोकसभेचे तिकीटच कापले गेले असा खुलासा सुजय विखे पाटील यांनी नगरमध्ये काल झालेल्या भर सभेत केला.  

वाचा : कच्चे तेल सहा वर्षात ६१ टक्के स्वस्त, तरी पेट्रोल १० रुपये महाग; आता पुन्हा टॅक्स लावण्याच्या तयारीत!

वाळकी येथे काल झालेल्या एका कार्यक्रमात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने विखेंसमोरच त्यांच्या हेलिकॉप्टर प्रचाराची आठवण करून दिली. हाच धागा पकडत सुजय विखे यांनी राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. हेलिकॉप्टर या एकमेव कारणामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने माझं लोकसभेला तिकीट कापलं, असा गौप्यस्फोट सुजय विखे यांनी नगरमध्ये सभेत बोलताना केला आहे. 

वाचा : शरद पवार साहेब, hats off! भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडून जाहीर कौतुक

उमेदवारी देण्याअगोदर शरद पवार यांनी तू आताच जर हेलिकॉप्टरमधून फिरत असशील तर निवडून कसा येणार? असा प्रश्न मला विचारला होता. नंतर आघाडीने मला तिकीट नाकारले आणि त्यानंतर जे काही झाले ते सगळे आपल्यासमोर आहे असे विखे म्हणाले. तसेच, त्यावेळी माझे नुकसान झाले. पण आता वाटते बरं झाले की त्यांचे तिकिट मिळाले नाही. आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाचा खासदार असून मला त्याचा अभिमान आहे. असे वक्तव्यही विखेंनी यावेळी केले. 

वाचा : एवढच बाकी होतं! चिराग पासवानांची लाईट, कॅमेरा, ॲक्शनमध्ये वडिलांना श्रद्धांजली (video)

लोकसभा निवडणुकीत आपल्याला हवी ती जागा न मिळाल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीने नगर दक्षिणची जागा सोडण्यास नकार दिला होता. यानंतर सुजय विखे यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनी विजय मिळत राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचा पराभव केला.