Sat, Aug 15, 2020 13:54होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : भरधाव वाळूच्या ट्रकने तिघांना चिरडले

अहमदनगर : भरधाव वाळूच्या ट्रकने तिघांना चिरडले

Published On: Jan 13 2019 7:22PM | Last Updated: Jan 14 2019 1:19AM
टाकळी ढोकेश्वर : प्रतिनिधी 

पारनेर तालुक्यातील खडकवाडीजवळ रविवार (दि.१३) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नागापूरवाडीला वाळू भरण्यास जात असलेल्या भरधाव हायवा ट्रकने मोटारसायकलवरील तिघांना चिरडले. या अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्‍थळावरून पळ काढला.

या अपघातातील मृतांमध्ये  गोरक्ष मेंगाळ, आई-बुधाबाई मेंगाळ दोघे रा.नागापूरवाडी (पळशी) तर सुमनबाई डंबे (रा.वनकुटे ता.पारनेर) यांचा सामावेश आहे. या अपघाताच्या घटनेनंतर संतप्त झालेल्‍या ग्रामस्‍थांनी घटनास्थळी आंदोलन सुरू केले असून, जोपर्यंत तहसीलदार, प्रांताधिकारी व पोलिस निरीक्षक येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह जागेवरून हलवू देणार नाही असा पावित्रा घेतला आहे. यामुळे परिसरातील वाळू तस्करांविरोधातील वातावरण चांगलेच तापले आहे.